Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री गडकरींना धमकी देणार्‍याचे आता पोलिसांना आव्हान

फोन सापडल्यानंतररच आरोप करा - 72 तासानंतरही फोन शोधण्यात पोलिसांना अपयश

नागपूर/प्रतिनिधी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या कैद्याने आता पोलिसांनाच आव्हान दिले आहे. जाओ पहले फोन लेके

शक्तीशाली भूकंपाने एकाचवेळी तीन देश हादरले
ओडिशाच्या चांदीपूर येथे पिनाकची यशस्वी चाचणी
लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम

नागपूर/प्रतिनिधी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या कैद्याने आता पोलिसांनाच आव्हान दिले आहे. जाओ पहले फोन लेके आओ असे म्हणत फोन शोधून काढण्याचे आव्हान या कैद्याने पोलिसांना दिले आहे. आधी फोन शोधा आणि मग आरोप करा असे या कैद्याने पोलिसांना आव्हान दिले आहे.

कर्नाटकच्या बेळगाव कारागृहात असलेल्या कुख्यात जयेश कांथाने नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्याने ज्या मोबाईलवरून फोन केला होता तो फोन आता सापडत नाहीये. विशेष म्हणजे त्याने फोन कुठे ठेवला आहे हेही तो पोलिसांना सांगत नाहीये. उलट जाओ पहले फोन लेके आओ असे तो पोलिसांना म्हणत आहे. फोन शोधून काढण्यासाठी पोलिस त्याची चौकशी करत आहेत. मात्र तो चौकशीत सहकार्य करत नाहीये. त्यामुळे फोनचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. तुम्ही जो मोबाईल माझा आहे असे सांगत आहात, आधी तो मोबाईल शोधा. त्यातील सीम कार्डही शोधा, असे आव्हानच हा कैदी पोलिसांना देत आहे. त्यामुळे 72 तासानंतरही फोन सापडत नसल्याने पोलिसांना मोठे अपयश आले आहे. जयेशने तुरुंगातूनच नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन केला होता. 100 कोटींची खंडणीची मागणी करत आपण दाऊद इब्राहीमचा साथीदार असल्याचे तो म्हणाला होता. पोलिसांना त्याच्याकडे एक डायरी मिळाली आहे. त्यात नेते आणि मंत्र्यांचे फोन नंबर आहेत. पोलिसांनी ही डायरी जप्त केली आहे. जयेशकडे राजकीय पुढारी आणि मंत्र्यांचे नंबर कसे आले? याचा शोध पोलिस घेत आहे. या मंत्री, पुढार्‍यांशी जयेशचे संबंध होते का? की हे मंत्री आणि पुढारी त्याच्या रडारवर होते? याचाही पोलिस शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

COMMENTS