Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरेयांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

परळी प्रतिनिधी - सुमारे आठ नऊ वर्षापुर्वी परळी शहर पोलिस ठाण्यातील पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळी येथील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सी

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; लिपिक जाळ्यात
देशातील 1 टक्के श्रीमंताकडे 40 टक्के संपत्ती
देशभरात 70 लाख सिमकार्ड केले ब्लॉक

परळी प्रतिनिधी – सुमारे आठ नऊ वर्षापुर्वी परळी शहर पोलिस ठाण्यातील पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळी येथील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडी ने अटक केली आहे.अंबाजोगाई सत्र न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेने खळबळ उडाली आहे.
दिनांक 16.08.2014 रोजी परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. मौजे नागापुर येथील तुकाराम संभाजी जोगदंड हा थर्मल पॉवर स्टेशन येथे कामाला होता. चोरीच्या संशयावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.पोलीसांनी जबर मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.पंरतु पोलीसांनी आत्महत्येचा बनाव रचून केस दाखल केली. यापूर्वी चार पोलिसांना अटक करून त्यांच्याविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून सदर सत्र न्यायालयात वर्ग केली होती. त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे सुनावले आहे.

COMMENTS