कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस

शालेय शिक्षणमंत्री यांच्या आदेशाचा धसका

अभिजित खंडागळे/पाथर्डी : परिक्षा केंद्रावर कॉपीचा गैरप्रकार झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काढलेल्या

कोपरगाव तालुक्यात ’स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजने’चा जल्लोषात शुभारंभ
काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षचा राजीनामा
कोपरगाव बस आगारात वरिष्ठांच्या खुर्च्या रिकाम्या

अभिजित खंडागळे/पाथर्डी : परिक्षा केंद्रावर कॉपीचा गैरप्रकार झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काढलेल्या आदेशाचा पाथर्डी तालुक्यातील व शहरातील शिक्षण संस्थानी धसका घेतला असून याच अनुषंगाने शनिवारी दहावीच्या पेपरवेळी परिक्षा केंद्राबाहेर शिक्षकच कॉपी रोखण्यासाठी पोलिस बनल्याचे पहावयास मिळाले. १० वी आणि १२ वी च्या परीक्षेसाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून गैरप्रकार रोखण्यासाठी दरवर्षी उपाययोजना करण्यात येतात. परंतु १५ मार्च रोजी दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरदरम्यान पैठण तालुक्यातील एका परीक्षा केंद्राबाहेर शिक्षकच कॉपी पुरविताना निदर्शनास आल्याने त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून,असे प्रकार ज्या परिक्षा केंद्रावर होतील.त्यांचीही मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षण विभागाच्या या कारवाईनंतर शनिवारी दहावीच्या पेपर दरम्यान पाथर्डी तालुक्यातील व शहरातील शिक्षण संस्थेवर परीक्षा केंद्राबाहेर कॉपी रोखण्यासाठी शिक्षकांची फौज तैनात केल्याची पहावयास मिळाले.तर शिक्षक कॉपीचा गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना मात्र शिक्षकांना काही कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून ते त्याच्याशी वाद घालत असल्याची खंत व्यक्त करत,या टोळक्याचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानंतर
पाथर्डी तालुक्याला लागलेली कॉपीची कीडीचा नायनाट होऊन गरीब हुशार विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेला न्याय मिळेल असा आशावाद जनतेतून व्यक्त केला जात आहे.

COMMENTS