Homeताज्या बातम्यादेश

जागतिक मुष्टियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेतीलभारताच्या खेळाडूंचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मुष्ठियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय विक्रमी कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन

मिस इंडिया रायझिंग स्टार 2023 अ‍ॅट ताज किताबने सातारची कु. स्नेहल चांगण सन्मानीत
वाडियापार्कमध्ये रंगणार राज्य आंतरजिल्हा व महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा
खेलो इंडिया यूथ गेम्स; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध तर पार्थ कोरडेला रौप्यपदक
Image

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मुष्ठियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय विक्रमी कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. आपल्या खेळाडूंनी 9 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदके जिंकली, ही भारताच्या मुष्टीयोद्ध्यांची एक ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे यश देशाच्या मुष्टीयोद्ध्यांचा निर्धार, दृढ संकल्प आणि अथक भावनेचे आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

या संदर्भात एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश : “आपल्या दमदार खेळाडूंनी जागतिक मुष्टियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय, विक्रमी कामगिरी केली! त्यांनी 9 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदके जिंकली. हे सर्व आपल्या मुष्टीयोद्ध्यांच्या दृढ संकल्प आणि निर्धारामुळे शक्य झाले. त्यांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

COMMENTS