Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी भूखंड मंजूर

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी 2.327 एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्

येवल्यात शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा | LokNews24
आयसीएच‌आर ने ऐतिहासिक चूक करू नये ! 
पुण्यात चक्क झुरळांमुळे काही तास रखडली रेल्वे

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी 2.327 एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या 2 वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाच्यावतीने अयोध्या येथे राष्ट्रीय राजमार्ग, शरयू नदीजवळ ग्रीन फिल्ड टाऊनशिप विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी हा भूखंड उत्तर प्रदेश सरकारने मंजूर केला आहे. भूखंड अधिग्रहित करण्यासाठी 67.14 कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण व अन्य सोयी सुविधांसाठी सुमारे 260 कोटीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती, काल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रस्तावित जागेची अयोध्या येथे पाहणी करतेवेळी दिली. यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुत्रे, मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्यासह उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाच्या आवास योजनेचा अभियंता पी.के.सिंग, अभिषेक वर्मा, विनय चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते. अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून सुमारे 7.5 कि.मी. तर अयोध्या धाम रेल्वे स्टेशनपासून 4.5 कि.मी. अंतरावर हे प्रस्तावित महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार आहे. अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 11 कि.मी. अंतरावर हे महाराष्ट्र सदन उभे राहणार आहे, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.

COMMENTS