Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी वृक्षारोपण

अहमदनगर - सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व पू.निरंकारी राजपिता रमितजी यांचे दिव्य मार्गदर्शन व आर्शिवादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण सं

दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगार जेरबंद
निळवंडेचे खुले कालवे व चार्‍या लाभक्षेत्रासाठी वरदान ः विलास गुळवे
पाथर्डी आगारातील बसचा प्रवास बनला धोकादायक

अहमदनगर – सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व पू.निरंकारी राजपिता रमितजी यांचे दिव्य मार्गदर्शन व आर्शिवादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने 2021 साली ‘वननेस वन’ अर्थात लघुवन (समूह वृक्षारोपण) नामक मेगा परियोजना सुरु करण्यात आली. सदर उपक्रमाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन देशभरातील 600 हून अधिक ठिकाणी येत्या रविवारी (11 ऑगस्ट) रोजी सकाळी 8 ते 12 या वेळात एकाच वेळी राबविण्यात यईल.
निरंकारी मंडळाच्या अहमदनगर शाखेच्या वतीने सुद्धा भिस्तबाग महाल समोरील (तपोवन रोड) नियोजित निरंकारी सत्संग भवनच्या प्रांगणात व परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती मंडळाचे नगर झोन प्रमुख हरीश खुबचंदानी यांनी दिली. तसेच झोन 36 अ अंतर्गत येणार्या मंडळाच्या शाखांच्या वतीने सुद्धा त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की गेल्या तीन वर्षापासून अखंडपणे सुरु असलेल्या या कार्यक्रमा अंतर्गत देशभरात 2.50 लाख हून अधिक वृक्षांचे रोपण केले गेले असून मिशनच्या सेवादारांकडून या वृक्षांचे जतन, संंगोपन नियमितपणे केले जात असून पर्यावरण रक्षणासाठी व प्रकृतीचा समतोल कायम ठेवण्यासाठी निरंकारी मिशनचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम अर्थात ‘वननेस वन’ चा उपक्रम यात महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. तरी नगरवासियांनी व भाविकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS