Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरखेड यात्रेनिमित्त तहसील कार्यालयात नियोजन बैठक उत्साहात

रस्त्यावरील बाभळी तोडा, लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करण्याची मागणी

नेवासाफाटा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर ने

निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी : अपर जिल्हाधिकारी कोळेकर
डॉ. सी. व्ही. रामन परीक्षेत आबासाहेब काकडे विद्यालयाचे यश
संजीवनीचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल

नेवासाफाटा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर नेवासा तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली. रस्त्यावरील बाभळी तोडा, लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करुन रस्ता सुरळीत करा अशी एकमुखी मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली.
यावेळी झालेल्या बैठकीच्या प्रसंगी वरखेड महालक्ष्मी मंदिर देवस्थानचे सचिव कडूबाळ गोरे यांनी येणार्‍या भाविकांसाठी लागणार्‍या पाणी,आरोग्य,वाहतूक सुविधा, संरक्षण याबाबत आपल्या काही महत्वपूर्ण सूचना यावेळी बोलतांना केल्या. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येतील, पार्किंग व्यवस्था ग्रामस्थरावर बैठक घेऊन केली जाईल, वीज वितरण कंपनीच्या वतीने डीपी बदलण्यात येईल व लोंबकळलेल्या तारांचे काम चार दिवसात पूर्ण केले जाईल असे ठरले. रस्त्याचे डागडुजीचे काम करण्यात येऊन रस्त्यावरील काटेरी झुडुपे काढण्यात यावे,वरखेड ते शिरसगाव रस्त्यावर भाविकांना येण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही याबाबत उपाय योजना करण्यात यावी, एस बसेस गावाच्या बाहेर प्रांगणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, यात्रेत अवैद्य व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी तसेच हे व्यवसाय चालणारच नाही याची पोलिस स्टेशनने उपाययोजना करावी व त्यादृष्टीने पावले उचलावीत, पंधरा लाख भाविक दर्शनासाठी येतील यासाठी एस टी महामंडळाने चांगल्या बसेस उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली. सर्व मुद्दे लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने योग्य ती कार्यवाही केली जाईल यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी केले. सदर बैठक प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शैलेश ससाणे, एस टी आगार व्यवस्थापक रामनाथ मगर, सहायक अभियंता आर एच सत्राम, महालक्ष्मी मंदिर देवस्थानचे सचिव कडूबाळ गोरे पाटील, उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे, सरपंच विनोद ढोकणे, ग्रामसेवक ए.टी. डेंगळे, तलाठी व्ही व्ही वाघ, पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरराव भारस्कर, आरोग्य सहायक बी पी राठोड, अवि गुंड, गोपनीय शाखेचे गणेश फाटक, जी आर काळे, विश्‍वस्त सुरेश शिरसाठ, रंगनाथ पवार, रविंद्र शिरसाठ,  किशोर शिरसाठ, देविदास शिरसाठ, बाळासाहेब शिरसाठ, नवनाथ वाघ, भगवान जगधने उपस्थित होते.

COMMENTS