Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा    

दोन हजार कोटी खर्चून नवे दर्शन मंडप, स्कायवॉक

सोलापूर : वाराणसीच्या धर्तीवर विठ्ठल मंदिर परिसराचा कायपालट करण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा मांडण्यात आला आहे. यात पुढील 25 वर्षांचा विचार कर

व्हाट्सअँप ला स्टेटस ठेवून शिक्षकाची आत्महत्या
हातात फावडे घेऊन राखी सावंत थेट रिक्षाच्या मागे धावली.
महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबिनेट’

सोलापूर : वाराणसीच्या धर्तीवर विठ्ठल मंदिर परिसराचा कायपालट करण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा मांडण्यात आला आहे. यात पुढील 25 वर्षांचा विचार करून विकासकामे करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विकासकामात पुरातत्त्व खात्याच्या मदतीने विठ्ठल मंदिराची दुरुस्ती, नवे दर्शन मंडप, स्कायवॉक, नऊ वाहनतळे, रस्ते रुंदीकरण आदींचा समावेश आहे. प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, पालखीतळ, वाहनतळ, उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. प्रदक्षिणा मार्ग ते मंदिर परिसरात 21 रस्ते तर पंढरपूर शहरात 17 नवीन रस्ते करण्यात येणार आहेत. यामध्ये काही रस्त्यांची रुंदी वाढविण्यात येणार आहे. मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावरील रुंदीकरणास नागरिकांचा विरोध असला राज्यातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून समोर येण्यासाठी हा कॉरिडॉर पूर्णत्वास येण्याची गरज आहे.

COMMENTS