Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिस्तुलातून खडकवासला धरण परिसरात गोळीबार

पुणे: मजा म्हणून परवानाधारक पिस्तुलातून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोळीबार करणे तरुणांच्या अंगलट आले. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत

आता फुले- आंबेडकर येणार नाहीत
Yeola: खरेदी-विक्री संघामध्ये शासकीय हमीभावाने ऑनलाइन नोंदणीला सुरुवात
लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची हत्या

पुणे: मजा म्हणून परवानाधारक पिस्तुलातून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोळीबार करणे तरुणांच्या अंगलट आले. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत माजविल्या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तेजस गोंधळे (वय 29, रा. तेजदीप निवास, गोंधळेनगर, हडपसर.), अजिंक्य मोडक (वय 34, रा. फुरसुंगी), चेतन मोरे (वय 24, रा. तुकाई दर्शन) यांच्या विरुद्ध हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस, अजिंक्य आणि चेतन सिंहगड परिसरात फिरायला गेले होते. तेथून परतत असताना तिघे जण खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ थांबले. तेथे पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज परिसरातील उपहारगृहचालक आणि नागरिकांनी ऐकला. त्यांनी हवेली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. गोंधळे, मोडक, मोरे मोटारीतून निघून गेले. परिसरातील नागरिकांनी वाहनांचा क्रमांक टिपून ठेवला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना मोटारीचा क्रमांक मिळाल्यानंतर तातडीने तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा पिस्तूल बाळगणारा तेजस याच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शस्त्र परवान्याबाबत सखोल चौकशी केली. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करुन दहशत माजविल्या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते तपास करत आहेत.

COMMENTS