Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वज्रमुठ महाविकास आघाडी विराट जाहीर सभा स्थळ ठिकाणी आज चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते स्तंभ पूजन 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - महाविकास आघाडी तर्फे दोन एप्रिल रोजी मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ खडकेश्वर येथे विरार जाहीर सभा होणार आहे

आमच्यासोबत आले म्हणून बरं झालं… नाहीतर काँग्रेसची अवस्था आणखी वाईट झाली असती
मूर्खाच्या नंदनवनात वावरणारा संजय राऊत त्याला भाव देऊ नका
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – महाविकास आघाडी तर्फे दोन एप्रिल रोजी मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ खडकेश्वर येथे विरार जाहीर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित राहणार असून या ठिकाणी आज शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे व विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत स्तंभ पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार किशोर पाटील उपस्थित होते. चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली संपूर्ण महाविकास आघाडीच्या विभागाप्रमाणे मेळावा होणार त्यातून हा संभाजीनगरला पहिला होत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे मिळून होत आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येणार आहेत. जेव्हाही सभा घ्यायची असली तेव्हा आम्ही स्तंभ पूजन करत असतो आणि स्तंभ पूजनाने यशस्वी प्रकारे वाटचाल होते. ही आमची परंपरा आहे, त्यामुळे आज आम्ही स्तंभ पूजन केले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. दोन तारखेची सभा ही विराट होईल, असे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. 

COMMENTS