चंद्रपूर : भारतातून शुक्रवारी 5 मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातुन दिसणारे हे यंदाचे पहिले ग्रहण असेल. यात चंद्र पृथ्वीच्या उपछायेत
चंद्रपूर : भारतातून शुक्रवारी 5 मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातुन दिसणारे हे यंदाचे पहिले ग्रहण असेल. यात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जात असल्याने चंद्र किंचित अंधुक होतो म्हणून त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
गेल्या 20 एप्रिल रोजी अतिशय सुरेख असे ’’हायब्रीड’’ सुर्यग्रहण झाले होते. परंतु ते भारतातून दिसले नाही. शुक्रवारी 5 मे रोजी होणारे हे छायाकल्प चंद्रग्रहण फारसे सुंदर दिसत नसले तरी खगोलीय दृष्टीने महत्वाचे असते.खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण होताना चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून जातो, त्यामुळे चंद्र काळा,लाल दिसतो,परंतु छायाकल्प चंद्रग्रहणात मात्र चंद्र काळा,लाल दिसत नाही,तो नियमित पौणिमेच्या चंद्रासारखाच परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास थोडा काळपट झालेला दिसतो.हे छायाकल्प चंद्रग्रहण आशिया,आस्ट्रेलिया, युरोप,पूर्व आफ्रिका,पेसिफिक,इंडीयन आणि अटलांटिक महासागरातून दिसेल.
COMMENTS