फलटण / प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद हद्दीमध्ये श्री. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दि. 21 रोजी आगमन होत असून नगरपरिषदे मार्फत दरव

फलटण / प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद हद्दीमध्ये श्री. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दि. 21 रोजी आगमन होत असून नगरपरिषदे मार्फत दरवर्षी श्रीसंत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्तमरित्या पार पाडणे करीता फलटण नगरपरिषद सज्ज असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी फलटण नगरपरिषद संजय गायकवाड यांनी दिली.
फलटण नगरपरिषद हद्द सुमारे 7.15 स्न्वेअर किलो मीटर आहे. या मध्ये मुख्य पालखी तळा व्यतिरिक्त विविध ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असणार्या दिंड्या मुक्कामी राहतात. या सर्व ठिकाणी पालखी पुर्व व पालखी पश्चात स्वच्छतेचे प्रमुख नियोजन नगरपरिषदे मार्फत करण्यात आली आहे. शहर स्वच्छता नियोजन शहर स्वच्छते करीता 2 स्वच्छता निरिक्षक, 6 मुकादम, 130 सफाई कर्मचारी, 150 शासनाकडील जादा कर्मचारी, 25 ठेका सफाई कर्मचारी, 16 घंटागाड्या, 4 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 टाटा 407, 1 टाटा 607, 1 जेसी मशिन याव्दारे संपूर्ण शहर व पालखी तळाची स्वच्छता केली जाते. गत वर्षी 2 ट्रॅक्टर ट्रॉली, 1 टाटा 607, 1 जेसी मशिन 150 शासनाकडील जादा कर्मचारी, 25 ठेका सफाई कर्मचारी जादा लावणेत येऊन संपूर्ण शहरची पालखी पूर्व पालखी पश्चात स्वच्छतेचे नियोजन केले आहे. तसेच रोगराई पसरु नये, संसंर्ग टाळणे करीता जंतुनाशक व 12 फॉगींग मशिनद्वारे धुर फवारणी केली जाते. यामुळे साथरोगाचा प्रार्दुभाव होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता नगरपरिषद घेत आहेत. संकलीत झालेल्या कचर्यावर नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प केंद्र येथे शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करणेत येणार आहे.
COMMENTS