राज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे संकेत

नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. मात्र आठवडा उल

देशसेवा व समाज कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा – हरिभाऊ डोळसे
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना दणका
‘ब्रह्मास्त्र’ ची स्टोरी रिलीजपूर्वीचं झाली लीक.

नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. मात्र आठवडा उलटला तरी अद्याप कर कमी झालेला नाही. दरम्यान, याच घोषणेबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी महत्वाचे विधान केले आहे. ज्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता बळावली आहे.
महाराष्ट्रातील जनतेला लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त दरात उपलब्ध होईल, असे पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी म्हटलं आहे. हा राजकीय मुद्दा नाही पण महाराष्ट्र सरकारने व्हॅट कमी केले तर पेट्रोलचा दर कमी होईल, असे पुरी यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील मूल्यवर्धीत करात (व्हॅट) कपात करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौर्‍यावर आहेत. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी 9 जुलै 2022 रोजी देशातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थेच ठेवले आहेत. सलग 49 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मुंबईत आज शनिवारी एक लीटर पेट्रोलचा भाव 111.35 रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये इतका आहे. कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईत पेट्रोलचा भाव 102.63 रुपये झाला आहे. बंगळुरुमध्ये पेट्रोलचा भाव 101.94 रुपये इतका असून चंदीगडमध्ये 96.20 रुपये इतका आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा 97.28 रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेल 89.62 रुपये आहे. चेन्नईत एक लीटर डिझेलचा भाव 92.24 रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव 92.76 रुपये इतका आहे.

COMMENTS