Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण लोहमार्ग पोलिसांची कामगिरी ; 24 तासात 7 सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या

कल्याण प्रतिनिधी - कल्याण आणि आसपासच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असून काल दिवस भारत कल्याण व शहाड रेल्वे स्थान

फॉर यंग विमेन इन सायन्स या शिष्यवृत्ती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत  
नाशकात पार पडला व्हॉईस ऑफ मिडीयाचा अधिवेशन सोहळा 
ठाकरेंच्या समर्थनार्थ जिल्हा शिवसेनेचा उद्या नगरला मेळावा

कल्याण प्रतिनिधी – कल्याण आणि आसपासच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असून काल दिवस भारत कल्याण व शहाड रेल्वे स्थानकावर एकूण अकरा मोबाईल चोरी झाल्याच्या घटना घडल्या असल्याने कल्याण लोहमार्ग पोलिसांनी विविध पथक बनवत गेल्या 24 तासात सात आरोपींना बेड्या ठोकत 10 मोबाईल हस्तगत केले. गेल्या काही दिवसांपासून कल्याण शहाड उल्हासनगर रेल्वे चालक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरी होत असल्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून धक्कादायक बाब म्हणजे काल दिवसभरात  कल्याण रेल्वे स्थानकातून दहा प्रवाशांचे मोबाईल तर शहाड येथून एक मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने कल्याण लोहमार्ग  पोलीस ॲक्शन मोडवर येत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांचे एक पथक नेमण्यात काल दिवसभरातील रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही तपासात , खबऱ्यांकडून माहिती घेत अवघ्या काही तासात तब्बल सात आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्याकडून 10 मोबाईल हस्तगत केले आहेत. सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सात आरोपी सराईत चोरटे असून त्यांच्या विरोधात या आधी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत. 

COMMENTS