ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :- फिरोजभाई पठाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :- फिरोजभाई पठाण

शेवगाव ता प्रतिनिधी : प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचा समतोल तसेच निसर्गाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागांमध्ये देखील वृक्षारोपण सं

Sangamner : गटार पाणी जलशुद्धीकरण प्रकलपाला भाजपाचा तीव्र विरोध (Video)
कोपरगाव शहरातील अनाधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त
गोधेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासाहेब शेळके

शेवगाव ता प्रतिनिधी : प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचा समतोल तसेच निसर्गाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागांमध्ये देखील वृक्षारोपण संवर्धनासाठी लोकचळवळ मोहीम राबवून वृक्षारोपण संकल्पना अमलात आणून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे ही आज काळाची बनली गरज आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यासाठी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात देखील हरित वनराईचे पट्टे निर्माण करण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या असमतोलामुळे भूतलावर दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहे. त्यामुळे मानवी जीवनावर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती येत आहेत. त्यासाठी समाजामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची लोकचळवळ निर्माण होण्याची आज मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे प्रतिपादन बोधेगाव सह परिसरातील येथील मुस्लिम समाजाचे युवा नेते तसेच ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते तसेच ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. ०९ जानेवारी २०२२ रोजी बोधेगाव सह परिसरात तसेच शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर आणि स्मशानभूमीत अनावश्यक तसेच अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन वृक्षांना खतांचा केक कापून, फेटे बांधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या एक्कावन्न रोपांची लागवड करण्यात आली असून यामध्ये आंबा, शिसम, गुलमोहर, कडूनिंब, उंबर, चिंच, वड, पिंपळ यासारख्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी बोधेगावचे उपसरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनभाऊ काकडे, वंचितचे नेते कमुभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते बाबाभाई पठाण, बबन कुरेशी, कासमभाई शेख, अशोकराव खिळे, बन्सी मिसाळ, सुनील कोहोक, वसीम शेख, रहीम शेख, अन्सारभाई शेख, दत्तू मिसाळ, दादू भोंगळे, हारून शेख, बालचंद्र पोपळभट, वसीम शेख, प्रमोद मिसाळ, ठेकेदार समीर शेख, अन्वर मणियार, ज्योतिराम शेळके, आजीम पठाण, पांडु तेवर, अनिस सय्यद, गणेश वारकड, तय्यब शेख, शरूख शेख, आजीम बागवान, बाबूभाई बागवान, गुलाम हुसेन यांच्यासह आदी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना फिरोजभाई म्हणाले की, अलीकडच्या काळात निसर्ग हा बदलत चालला असून त्यामुळे ऋतुचक्र देखील बदलत चालल्याने आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरण, हवामान यासह पर्यावरण बदलावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत चालला आहे. आज देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे सर्वांचीच ऑक्सिजनसाठी धावपळ सुरू आहे. या जागतिक कोरोना महामारीमुळे माणूस पुरता घायाळ झाला आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर देखील सुद्धा आपल्या औषधाच्या चिठ्यावरती ” झाडे लावा झाडे जगवा , ऑक्सिजन वाढवा ” असा संदेश देऊन वृक्ष लागवडीचा सल्ला देत आहे. त्यामुळे वृक्षां अभावी भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक तसेच आस्मानी संकटाला रोखण्यासाठी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ बनवण्याची गरज असल्याची यावेळी ते म्हणाले.

COMMENTS