Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपला लोकांनी सकशेप नाकारायला सुरुवात केली आहे –  कुणाल पाटील 

धुळे प्रतिनिधी - धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान 96% मतदान हे पूर्ण झाले असून किरकोळ ग

पेठवडज जवळ खुले आम दारू विक्रीविरोधात  नागरिकांनी, दारूबंदी अधिकाऱ्याच्या कार्यालयावर घातला घेराव  
रूपाली बोराडे पाटील यांना बेस्ट ड्रेस डिझायनर अवार्ड
बॅनरवरुन वाद ; तरुणाने केली आत्महत्या

धुळे प्रतिनिधी – धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान 96% मतदान हे पूर्ण झाले असून किरकोळ गोंधळ वगळता मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडली आहे. धुळे शहरातील महाराणा प्रताप विद्यामंदिर या ठिकाणी हे मतदान पार पडले आहे.

       धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून १५ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोंडाईचा आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून 252 उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित १५ जागांसाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

       भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यात जोरदार ‘काटे की टक्कर’ बघायला मिळत आहे. सकाळपासूनच खासदार सुभाष भामरे यांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. खासदार सुभाष भामरे हे पूर्ण वेळ मतदान केंद्र जवळच उपस्थित असल्याने त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. तर दुपारी अचानक धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची मतदान केंद्रावर एन्ट्री झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. त्यांनी आमदार कुणाल पाटील यांना चक्क खांद्यावर घेत मतदान केंद्रावर आणले यानंतर काही काळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

       यानंतर प्रसार माध्यमांना आमदार कुणाल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ज्या दिवसापासून बाजार समितीच्या निवडणुकांना सुरुवात झाली तेव्हापासून मी हेच वारंवार सांगत आहे की महाविकास आघाडी ही सर्वच्या, सर्व जागांवर विजय मिळवणार आहे. संपूर्ण राज्यात नाही तर देशात व गावागावात लोकांनी भाजपाला नाकारले आहे. ज्या प्रकारे धोरण भाजपा ने राबवायला सुरुवात केली त्या शेतीमालाला भाव नाही, शेतकरी विरोधी अर्थव्यवस्था निर्माण केली आणि शेतकऱ्यांच्या विरोधात जी धोरण भाजपने राबवली त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक ही भाजपाच्या विरोधात गेले आहे. अशी प्रतिक्रिया आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी दिली.

COMMENTS