फलटण : नगरपरिषदेच्या बाहेर काम बंद आंदोलन व धरणे आंदोलनास बसलेले कर्मचारी. फलटण / प्रतिनिधी : फलटण शहर मुन्सिपल कामगार संघटना यांनी दि. 11 रोजी फल
फलटण / प्रतिनिधी : फलटण शहर मुन्सिपल कामगार संघटना यांनी दि. 11 रोजी फलटण नगरपरिषदेच्या बाहेर काम बंद व धरणे आंदोलन सुरू केले आहे. मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दि. 25 मार्च रोजी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले होते. यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
फलटण शहर मुन्सिपल कामगार संघटनेने सविस्तर दि. 25 मार्च रोजी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना विविध मागणीचे निवेदन दिले होते. यामध्ये फलटण नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याकरिता व घरांना रंगरंगोटी, फराळाचे पदार्थ तसेच कपडे घेण्यासाठी पैशाची कमतरता भासत असते. तरी कर्मचार्यांना सण साजरा करण्यासाठी सातवा वेतन आयोगाच्या पोटी दुसरा हप्ता मिळावा. तसेच सेवानिवृत्त कर्मचार्यांना एकही हप्ता मिळाला नसून त्यांना सलग दोन हप्ते रोखीने मिळावेत.
2019 फरकाचे काही सेवानिवृत्त कर्मचारी राहिले आहेत त्यांचा फरक अदा करण्यात यावा. तसेच 2019 ते 2020 व 2020ते 2021 या दोन वर्षाचे चप्पल व कपडे तसेच स्वेटर इत्यादी देण्यात आलेली नसून निवेदनात नमूद मागण्या मंजूर कराव्यात, असे निवेदन फलटण मुन्सिपल कामगार संघटना यांच्या वतीने देण्यात आले होते. परंतू दि. 11 एप्रिल अखेरपर्यंत वरील विषयाची दखल न घेतल्याने दि. 11 रोजी सकाळपासून नगरपरिषद कर्मचार्यांनी कार्यालयाच्या बाहेर काम बंद आंदोलन व धरणे आंदोलन केले.
COMMENTS