पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला, कारागृहातच राहणार मुक्काम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला, कारागृहातच राहणार मुक्काम

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याला मुंबई उच्च न्यायालयाच्य

भातोडी लढाईचा प्रेरणादायी इतिहास घराघरांतून पोहोचावा ; शरीफजीराजे स्मृतिदिनी विविध पुरस्कारांचे वितरण
pathardi : गांजाची राखण करणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात l LokNews24
नवरात्रोत्सवात भाविकांना ई पास उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दणका दिला. या खून प्रकरणी जामीनावर सुटका होण्यासाठी त्याने केलेला अर्ज खंडपीठाने फेटाळला. त्यामुळे बोठेचा आता कारागृहातच मुक्काम असणार आहे.
30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांच्या हत्येची घटना घडली आहे. या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील याला 13 मार्च 2021 रोजी अटक झाली. तेव्हापासून तो तुरूंगात आहे. त्याने जामीनावर सुटका होण्यासाठी अर्ज केला होता. पण जिल्हा न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळला व हायकोर्टातही त्याला दिलासा मिळाला नाही. त्याचा जामीन अर्ज फेटाळला गेला. न्यायमूर्ती एम.जी. सेवलीकर यांनी हा निर्णय दिला. समोर आलेल्या कागदपत्रांनुसार आरोपीविरूद्ध अनेक सबळ पुरावे असल्याचे दिसून येते, त्यामुळे जामीन फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
आरोपी बोठे याने 14 जुलै रोजी नगरच्या सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीतर्फे अ‍ॅड. महेश तवले तर सरकारतर्फे अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांनी बाजू मांडली. 23 सप्टेंबरला जिल्हा व सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. समोर आलेल्या पुराव्यांवरून आरोपीचे वर्तन संशयास्पद असल्याने त्याचा गुन्ह्यातील सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे जिल्हा न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयाविरोधात बोठे याच्यावतीने ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आली होती. तेथे अनेकदा विविध कारणांमुळे सुनावणी लांबणीवर पडली. 28 फेब्रुवारीला त्यावर न्यायमूर्ती एम.जी. सेवलीकर यांच्यासमोर युक्तिवाद सुरू झाला. सरकारतर्फे सरकारी वकील डी. आर. काळे यांनी बाजू मांडली. तर मूळ फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड. एन. बी. नरवडे व अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी काम पाहिले. आरोपी बोठे व अन्य आरोपींचे झालेले फोन कॉल्स, त्याची दोषारोपपत्रात असलेली सविस्तर माहिती, सीडीआर रिपोर्ट, रेखा जरे यांचे लोकेशन सतत घेऊन ते आरोपींना कळवणे आणि तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आदी मुद्यांवर युक्तिवाद करण्यात आला. गुरुवारी या प्रकरणी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने निर्णय देत जामीन अर्ज फेटाळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर 2020ला सायंकाळी 8च्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून खून झाला होता. सुरवातीला हे प्रकरण गाडीला कट मारल्याच्या कारणातून झाल्याचे पुढे आले होते. मात्र, त्यानंतर हा कट रचून व सुपारी देऊन करण्यात आलेला खून असल्याचे तपासात उघड झाले. पत्रकार बोठे याचे मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आले. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न आणि बराच काळ फरारी राहिल्यानंतर अखेर बोठे याला अटक झाली. आता जामीनावर सुटकेसाठीचा त्याचा अर्ज फेटाळला गेल्याने त्याचा कारागृहातील मुक्काम कायम राहिला आहे.

COMMENTS