Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बापरे ! पठ्ठ्याने ट्रॅक्टरमधून धावत्या एसटी बसवर मारली उडी

बीडच्या माजलगाव तालुक्यातील शृंगारवाडी फाट्याजवळ घडली घटना या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला

बीड प्रतिनिधी - बीड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील शृंगारवाडी फाट्याजवळ दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगाने ज

जेऊर पाटोद्यात बिबट्याने केली शेळीची शिकार
मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला
बिहारमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या

बीड प्रतिनिधी – बीड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील शृंगारवाडी फाट्याजवळ दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या एसटीवर ट्रॅक्टर मध्ये बसलेल्या तरुणाने उडी मारली . मात्र ही स्टंटबाजी त्याच्या जीवावर बेतली आहे. उडी मारताना त्याचा तोल गेल्यानं तो एसटीला धडकून रोडवर जोरात पडला. आदळल्यानं या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गजानन मारोती बनाईत असं या मृत तरुणाचं नाव आहे. त्याने उडी का मारली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र स्टंटबाजी करण्यासाठी या तरुणाने उडी मारली असवी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS