पाथर्डी : खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे व माजी आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुका भाजपचे अध

पाथर्डी : खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे व माजी आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुका भाजपचे अध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी सर्व समावेशक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ, महिला, युवक स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी व जेष्ठांचा समावेश करीत कार्यकारीणी जाहीर केली.
यामध्ये प्रामुख्याने 4 सरचिटणीस, 10 उपाध्यक्ष, 10 चिटणीस , 1 कोषाध्यक्ष व 45 कार्यकारीणी सदस्यासह, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. काशिताई गोल्हार, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. सचिन वायकर, शहर अध्यक्ष श्री. बंडू रणजित बोरुडे, शहर महिला अध्यक्षा ज्योती शर्मा, किसान मोर्चा अध्यक्ष श्री. उध्दव ससे, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री. भगवान साठे, ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष श्री. पांडूरंग सोनटक्के, तसेच मंडल स्तरावरील सर्व विभागाचे सेल, प्रकोष्ट व आघाडयांचे प्रमुख यांची नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर कायम निमंत्रीत सदस्य म्हणून खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्यासह 53 कायम निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर लवकरच मोर्चा व आघाडयांची कार्यकारीणी लवकरात लवकर प्रसिध्द केली जाणार आहे. ज्यामुळे होवू घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणूक व विधानसभेच्या निवडणूकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची एक मजबुत फळी तयार होण्याचे काम होणार आहे.
COMMENTS