Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दौड यांच्या भूमिकेनंतर पाथर्डी तालुक्याचे राजकारण तापले

अभय आव्हाड,मृत्युंजय गर्जे,अमोल गर्जे यांनी दिले प्रसिद्धीपत्रक

पाथर्डी प्रतिनिधी - पाथर्डी तालुक्यातील राजकारण तापले असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौड यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या हगाम

जनार्दन स्वामींवरील दीर्घकाव्याच्या मुखपृष्ठाचे अनावरण
LokNews24 l महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय पोरका
चोरट्यांचा आता शेतातील पिकांवर डोळा

पाथर्डी प्रतिनिधी – पाथर्डी तालुक्यातील राजकारण तापले असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौड यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या हगाम्याप्रसंगी बोलताना आपली राजकीय पुढील भूमिका स्पष्ट करत तालुक्यातील जनतेचा विकास करायचा असल्यास तालुक्यातील दोन्ही घराणेशाहीला साथ न देता माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला ताकद देत लोकप्रतिनिधी करा असे आवाहन केले आहे.

          दरम्यान गोकुळ दौड यांच्या पक्षविरोधी भूमिकेनंतर मात्र कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या भाजपाच्या आजी माजी पदाधिकारी अचंबित झाले असून याच अनुषंगाने माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,डॉ.मृत्युंजय गर्जे,अमोल गर्जे यांच्या वतीने प्रसिद्ध पत्रक देण्यात आले असून 

त्यात त्यांनी म्हटले आहे की, ६ सप्टेंबर रोजी गोकूळ दौंड यांच्या वाढदिवसानिमीत्ताने पाथर्डी येथे कुस्ती हगामा कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी मित्रत्वाच्या नात्याने आम्ही व्यक्तिशः जाऊन शुभेच्छा दिल्या.सदर प्रसंगी गोकूळ दौंड यांनी तालुक्याचे सन्माननीय नेतृत्व तसेच भारतीय जनता पक्षाविषयी घेतलेली विरोधी भूमीका ही त्यांची वैयक्तिक असून त्यांच्या भूमीकेशी आम्ही सहमत नाहीत.आम्ही भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून आम्ही पक्ष व नेतृत्वाबबरोबर सदैव आहोत.

दौड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना म्हटले की,आजही उसतोड करण्याची वेळ समाजातील घटकांवर असून राहिला घर नाही.शेतकऱ्याच्या शेतीला पाणी नाही,कष्टकऱ्यांच्या हाताला काम नाही.अशी परिस्थिती तालुक्याची असून दोन घराण्यांनी मला विकास नावाची व्याख्या समजून सांगावी.त्यांनी मोठमोठे कारखाने उभे करावेत पण गोरगरीब जनतेच काय?त्यांनी आयुष्याभर ऊसतोडनी करायची का?सत्तर वर्षात पाणी नाही.सुख दुःखात न दिसणारे नेते आज निवडणुका आल्या म्हणून गावगाव फिरताना दिसत आहेत.माझं राजकारण जे व्हायचं ते होईल पण सर्वसामान्य जनतेने जाती पातीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे.येणाऱ्या काळात सत्तर वर्षांपासून आपल्या हक्कापासून वंचित ठेवलेल्या माझ्या माणसांसाठी मी संघर्ष करत सत्य काय असत्य काय हे जाहीर सभेतून सांगणार आहे असे प्रतिपादन केले.

COMMENTS