Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिक्षा चालकाकडून प्रवासी तरुणीला मारहाण

पुणे ः पुण्यात पुन्हा एकदा एका रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे. एका प्रवासी तरुणी सोबत रिक्षाभाड्यावरुन झालेल्या वादातून रिक्षाचालकान स्वतः जव

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
पुण्यात रस्ते दुरुस्तीसाठी ‘पॉलिमर काँक्रिट’चा प्रयोग
टेलीग्राम अ‍ॅपच्या सीईओंना अटक

पुणे ः पुण्यात पुन्हा एकदा एका रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे. एका प्रवासी तरुणी सोबत रिक्षाभाड्यावरुन झालेल्या वादातून रिक्षाचालकान स्वतः जवळील चावीने प्रवासी तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना गंगाधाम रस्त्यावर घडली आहे. या घटनेत प्रवासी तरुणीच्या डोळ्याच्या खाली, तसेच कपाळाला दुखापत झाली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अक्षय नंदू खिलारे (वय-28, रा. शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत जयश्री किरण गिरी (वय 28, रा. जाधव वस्ती, सावळी विहिर, शिर्डी, जि. अहमदनगर) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. गिरी शिर्डीहून 30 जुलै रोजी मध्यरात्री पुण्यात कामानिमित्त आल्या होत्या. त्या रिक्षातून कोंढव्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास उतरल्या. त्यावेळी रिक्षाचालक खिलारे याने त्यांना स्वस्तात लॉज मिळवून देतो, असे त्यांना सांगितले. गिरी यांनी रिक्षा भाड्याबाबत विचारणा केली. तेव्हा खिलारे याने 800 रुपये रिक्षा भाडे झाल्याचे त्यांना सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. खिलारे याने त्याच्याकडील चावीने गिरी यांना मारहाण केली. गिरी यांच्या डोळ्याखाली बाजूस, तसेच कपाळावर चावी लागल्याने त्या जखमी झाल्या. पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळ पुढील तपास करत आहेत.

COMMENTS