Homeताज्या बातम्यादेश

इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात प्रवाशाचा मृत्यू

नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्ली-दोहा इंडिगो विमानात हृदय पिळवटून टाकणारं प्रकरण समोर आलंय. एक प्रवासी आजारी पडल्यामुळं इंडिगो एअरलाइनच्या व

मेस्सीला रोनाल्डो पेक्षाही दुप्पट रकमेची ऑफर
जावळी तालुक्यात चोरट्यांकडून 21 बंद घरे लक्ष्य : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वसई-विरारमध्ये 14 अतिधोकादायक इमारत जमीनदोस्त

नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्ली-दोहा इंडिगो विमानात हृदय पिळवटून टाकणारं प्रकरण समोर आलंय. एक प्रवासी आजारी पडल्यामुळं इंडिगो एअरलाइनच्या विमानाचं पाकिस्तानतील कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. इंडिगो एअरलाइन्सनं सांगितलं की, विमानतळावर वैद्यकीय पथकानं प्रवाशाला मृत घोषित केलं. हा प्रवासी नायजेरियन नागरिक आहे. इंडिगो फ्लाइटमध्ये एका प्रवाशाला विमानात मध्यभागी अस्वस्थ वाटू लागलं होतं. यानंतर फ्लाइटच्या पायलटनं कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली. कराचीमधील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या प्रवक्त्यानं पुष्टी केली की, ‘भारतीय विमान कंपनीचं विमान दिल्लीहून दुबईला जात असताना उड्डाणाच्या मध्यभागी एक प्रवासी आजारी पडला.’ त्यानंतर इंडिगो विमानाच्या वैमानिकानं वैद्यकीय आणीबाणीमुळं आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती, जी कराची विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रकानं मंजूर केली. अब्दुल्ला (वय 60) असं प्रवाशाचं नाव असून तो नायजेरियन नागरिक आहे. मात्र, विमान उतरण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. CAA आणि NIH च्या डॉक्टरांनी प्रवाशाचं मृत्यू प्रमाणपत्र जारी केलंय. दरम्यान, इंडिगो एअरलाइननं शोक व्यक्त केला आहे

COMMENTS