मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारकडून कंत्राटी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याविरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक
मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारकडून कंत्राटी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याविरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली, शिवाय पक्ष फोडला आता कंत्राटी भरतीचे पाप करू नका, अशी सडकून टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
यावेळी वडेट्टीवार अजित पवारांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही स्वत:ला मोठे नेते म्हणवता. मात्र, तुम्ही पक्ष फोडला. आता कंत्राटी भरतीचे पाप तरी करू नका. 9 खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन नोकर भरती करण्याता निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य शासनाने तसा अध्यादेशही काढला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला इशारादेखील दिला आहे. वडेट्टीवार यांनी तरुणांना आवाहन केले की, हे नालायक सरकार राज्यातील तरुणाई उद्धवस्त करायला निघाले आहे. मात्र, मुलांनो रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जोपर्यंत हे सरकार अध्यादेश वापस घेत नाही. तोपर्यंत मागे हटू नका. दरम्यान, सरकारच्या कंत्राटी भरतीवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले असताना अजित पवार म्हणाले, राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पदभरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. अजित पवारांच्या या स्पष्टीकरणावर विजय वडेट्टीवारांनी तीव्र आक्षेप घेत अजित पवारांना खडेबोल सुनावले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, स्वतःला मोठा नेता म्हणावणारे अजित पवार खोटे बोलून तरुणांची फसवणूक करीत आहेत. अजित पवारांवर माझा हा थेट आरोप आहे. दिशाभूल करणारे वक्तव्य करू नका. महाराष्ट्रातील तरुणांना फसवू नका. तुम्ही पक्ष फोडून गेलात, हा तुमचा विषय आहे. आता तरुणांना उद्धवस्त करण्याचे पाप तरी करू नका. स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर हे पाप तुम्ही करू नका, अशा शब्दांत वडेट्टीवारांनी अजित पवार यांना सुनावले.
कंत्राटी भरतीमध्ये सर्वच पदाचा समावेश –विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले, कंत्राटी नोकरभरतीचा शासन अध्यादेश सरकारने 6 सप्टेंबर 2023 रोजी काढला. टीका झाल्यावर हा निर्णय आधीच्या सरकारचा होता, असे हे सरकार सांगत आहे. आमच्या वेळी हा निर्णय केवळ पंधरा प्रवर्गासाठी होता. त्यामध्ये डाटा ऑपरेटर संगणक चालक यांचा समावेश होता. सरकारने त्यामध्ये बदल करून शिपाई ते इंजिनियर या सर्वच पदांचा आता भरतीमध्ये समावेश केला आहे. पन्नास हजार वेतन असणार्या कर्मचार्यांचे दहा हजार रुपये थेट या कंपनीकडे जातील. उद्या ही कंपनी 20 हजार रुपये वेतनावर ठेवेल. त्यामुळे राज्यातील तरुणांचे भविष्य उद्धवस्त होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
COMMENTS