Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हा – किरण पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी - कृषी उत्पादनांच्या वाढीसाठी शासनाच्या अन्नप्रक्रिया योजनेत सहभागी होण्याचे आवाहन भुदरगड तालुका कृषि अधिकारी किरण पाटील यां

Ahmednagar : दुकान बंद करण्यास सांगणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला धक्काबुक्की | LOKNews24
भंगार चोरून नेणारे पाच आरोपी जेरबंद
 मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला

कोल्हापूर प्रतिनिधी – कृषी उत्पादनांच्या वाढीसाठी शासनाच्या अन्नप्रक्रिया योजनेत सहभागी होण्याचे आवाहन भुदरगड तालुका कृषि अधिकारी किरण पाटील यांनी त्यांच्या गारगोटी ( ता भुदरगड ) येथील कार्यालयात मिडियाशी बोलताना केले. याबद्दल अधिक माहिती सांगताना तालुका कृषि अधिकारी किरण पाटील म्हणाले की, केंद्र शासनाने नव्याने शेतकरी व तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी तसेच तळागाळातील विविध घटक व शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनुदानावर आधारित ही योजना तयार केली आहे.  ३५ टक्के अनुदानावर हि योजना कार्यान्वीत केली आहे.यामध्ये रूपये १० लाखा पर्यतचे अनुदान घेता येते.यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड,दोन वर्षाचे आयकार पत्रक बंधनकारक आहे. त्या सर्व योजनेत शेतकऱ्यांनी किंमत १० हजार  गु़ंतवल्र्‍यास या शासकीय या योजनेचा लाभ मिळु शकतो. या योजनेत अनुदानाचा लाभ घेता येतो.ही योजना  सर्वासाठी खूली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी किरण पाटील यांनी केले.

COMMENTS