Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पार्थ पवार यांच्या कंपनीवर १८०० कोटींच्या महार वतन जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप

https://www.youtube.com/watch?v=Dh_djk5964Y पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्यातील प्रतिष्ठित आणि महागड

 परांड्याच्या लाल मैदानात महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटेची बाजी 
आजचे राशीचक्र मंगळवार, २६ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
वक्फ दुरुस्ती विधेयक अधिवेशनात मंजूर करावे : राज ठाकरे


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्यातील प्रतिष्ठित आणि महागड्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन ज्याची आजची बाजारातील किंमत 1800 कोटींच्या घरात आहे, ती जमीन अवघ्या 300 कोटी रूपयांना खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. याविरोधात विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता व्यक्त होत आहे. पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले, मात्र या जागेची आजची किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

COMMENTS