Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयुष्यमान भारत योजना विकास प्रक्रीयेचा भाग ः ना.विखे पाटील

अहमदनगर ः आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आह

नेवाशातील वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद
 देवळाली प्रवरा येथे आदिवासी सन्मान मेळावा उत्साहात
आगीत नऊ माणसांसह चार जनावर होरपळले

अहमदनगर ः आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे. आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी  विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शहरातील दिनदयाळ प्रतिष्ठान परिवार, दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरभी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी पंतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा सुरभी रुग्णालयाचे चेअरमन अनिरूध्द देवचक्के माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पतसंस्थेने सभासदांकरीता सुरू केलेल्या हेल्थ कार्ड योजनेचा शुभारंभ यानिमिताने करण्यात आला.या उपक्रमाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकार्याचे अभिनंदन करून आज आरोग्य सुविधेचा वाढत्या  खर्चाचे सर्वात मोठे आव्हान समाजासमोर आहे.यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू करून यामाध्यमातून पाच लाख रुपयांपर्यत मोफत उपचार देण्याची अंमलबजावणी होत आहे.राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू त्यामध्येही सर्व अटी काढून पाच लाख रुपयांपर्यत उपचार मोफत देण्यात येतील.यामध्ये काही ग्रामीण भागातील रूग्णालय चालकांनी बेडची अटीमध्ये बदल करण्याच्या केलेल्या मागणीबाबत राज्य सरकार निश्‍चित विचार करेल असे विखे पाटील म्हणाले. देशात आज आरोग्य सुविधला विकासाचा भाग बनविण्यात आले असून आरोग्य सुविधेला बळकटी देण्यासाठी मोठी गुंतवणूक होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

COMMENTS