परळी प्रतिनिधी - प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर,कपीलधार(मांजरसुंभा) नियमित थेट बससेवा सुरू करण्याचा शुभारं
परळी प्रतिनिधी – प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर,कपीलधार(मांजरसुंभा) नियमित थेट बससेवा सुरू करण्याचा शुभारंभ शनिवार दि.22जुलै रोजी श्रीश्रीश्री 1008 सूर्य सिंहासनाधिश्वर जगद्गुरू डॉ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ष.ब्र.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज,सोनपेठ,अमृतेश्वर शिवाचार्य महाराज,जिंतूर,शंभूलिंग शिवाचार्य महाराज,अंबाजोगाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
परळी-कपीलधार थेट बससेवेची मागणी श्री.वैजनाथ मंदीर देवस्थानचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांच्यासह भाविक-भक्तांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती निवेदनाची ना.मुंडे यांनी तात्काळ दखल घेत विभागीय नियंत्रक,परीवहन विभाग,बीड यांना सदरील मार्गावर तात्काळ बस सुरु करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार बससेवा सुरू करण्यात आली.
यावेळी श्री.दत्ताअप्पा ईटके,डॉ.सुरेश चौधरी,रा.कॉ.पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके,माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,नगरसेवक आयुबभाई पठाण,राजेन्द्र सोनी,अनिल अष्टेकर,वैजनाथ बागवाले,माजी नगरसेवक महादेव ईटके,रमेश चौंडे,रवीन्द्र परदेशी,अॅड.मनोज संकाये,कुमारअप्पा व्यवहारे,अझीझभाई कच्छी,संजय खाकरे,प्रवीण फुटके,ओमप्रकाश बुरांडे,आत्मलिंग शेटे,रामेश्वर महाराज कोकाटे,अॅड.मनजीत सुगरे,अशोक नावंदे,विकास हालगे,आश्विन मोगरकर,सौ.रमाताई आलदे,सौ.चेतना गौरशेट्टे सह मोठया प्रमाणात महीला व भाविक-भक्तांची उपस्थिती होती.
श्रावण तसेच अधिक मासानिमित्त मोठया प्रमाणात लिंगायत समाजासह सर्व जाती-धर्माचे व ईतर राज्यातूनही भाविक-भक्त प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी येथील दर्शन घेऊन श्रीसंत मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्याकरिता कपीलधार(मांजरसुंभा) येथे जात असतात तसेच याठिकाणीतील निसर्गरम्य पर्वत टेकडयांमधून वाहणारा नैसर्गिक धबधबाही पर्यटकांसाठी आकर्षित करणारा आहे परंतू याठिकाणी जाण्यासाठी परळी येथून थेट बससेवा नसल्यामुळे भाविकांची व पर्यटकांची प्रचंड गैरसोय होत होती त्यामुळे भाविक-भक्त,पर्यटक व प्रवाशांच्या सोयीकरिता त्वरीत बससेवा सुरू केल्याबद्दल ना.धनंजय मुंडे यांच्यासह बीड परीवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक श्री.अजय मोरे,परळी बस स्थानकचे आगार प्रमुख श्री.प्रवीण भोंडवे,श्री.सचिन राठोड तसेच सर्व कर्मचारी वृंदांचे आभार विजयकुमार मेनकुदळे,चेतन सौंदळे,सोमनाथ निलंगे,रमेशअप्पा सपाटे,चंदूअप्पा हालगे,चंद्रकांत उदगीरकर,सदानंद चौधरी,संतोष पंचाक्षरी,अशोक नावंदे,दयानंद चौधरी,प्रकाश खोत,जगदीश मिटकर,गिरीष बेंबळगे,मकरंद नरवणे,सोमनाथ गोपनपाळे,रमाकांत बुरांडे,कैलास रिकीबे,शिरीष सलगरे,अनिल चौधरी,शरद घनचेकर,शेखर घेवारे,रमेश चौधरी सर,सुधीर ओपळे,मन्मथ नरवणे,संतोष चौधरी,मनोज बेंबळगे,निरंजन गौरशेटे,रत्नेश बेलुरे,संदीप चौधरी,उमाकांत पोपडे,अमोल वाघमारे तसेच भाविक -भक्तांच्यावतीने आभार व समाधान व्यक्त केले आहे.
COMMENTS