Homeताज्या बातम्यामनोरंजन

परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या लग्नाची तारीख ठरली

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंट झाल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आह

अमरावती जिल्ह्यातील वाहतूक सेवा ठप्प (Video)
अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना 10 ग्रॅम चांदीच्या नाण्याची भेट
छ. संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंट झाल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 25 सप्टेंबरला लग्न करणार आहेत. परिणीती आणि राघव चढ्ढा यांची एंगेजमेंट 13 मे 2023 रोजी दिल्लीत झाली होती. आता या वर्षी दोघे लग्न करणार आहेत. मात्र, लग्नाच्या तारखेबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीतीच्या टीमने लग्नाची तयारी सुरू केली आहे. तथापि, मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की परिणीती चोप्रा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिच्या लग्नाची तयारी सुरू करेल. हे लग्न राजस्थानमध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर गुरुग्राममध्ये रिसेप्शन होणार आहे

COMMENTS