Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संस्कारी मुला विषयी आई वडील धन्य होतात। 

नाशिक प्रतिनिधी - आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया!! या उक्तीनुसार  ज्याला आपल्या हिताची चिंता असते तसेच ज्याला आपले हित कळते. त

मनपाच्या 32 कोटींचा गैरवापर होऊ देणार नाही
ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :- फिरोजभाई पठाण
श्री हरिहर केशव गोविंद भगवान यात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन  

नाशिक प्रतिनिधी – आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया!! या उक्तीनुसार  ज्याला आपल्या हिताची चिंता असते तसेच ज्याला आपले हित कळते. त्याचे आई वडील हे  धन्य होतात. ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले-मूली जन्माला येतात,  त्या कुळाविषयी परमेश्वरालादेखील आनंद होत असल्याचे विचार प्रसिद्ध कीर्तनकार फौजी महाराज सुर्यवंशी यांनी  व्यक्त केले. पंचवटीतील दुर्गा नगर  येथील हनुमान मंदिरात स्वामी विवेकानंद कला केंद्र व सांस्कृतिक मंडळातर्फे  हरिनाम  सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. दि.२४ एप्रिल पासून सुरू झालेल्या या सप्ताहाची सांगता १ मे रोजी होणार आहे. पुढे महाराज म्हणाले की ,गीता , भागवत, ज्ञानेश्वरी चे सर्वांनी पठण केल्यास जीवनात यश मिळते. 

सात्विक वृत्तीची मुले गीता-भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे चिंतन करतात . अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्यवान मीच ठरेल, असे तुकोबाराय  या अभंगात म्हणतात. सप्ताहात सुदाम महाराज घाडगे , (नाशिक ) टेकाळे महाराज (नाशिक), अश्विनीताई बर्वे ( माडसांगवी)  यांचे कीर्तन झाले. तर सप्ताहात डांगे महाराज (नाशिक ) ,शिवलिंग स्वामी महाराज  ( दसक पंचक),  त्र्यंबकानंद सदगीर महाराज  (सिन्नर ) यांचे कीर्तन होणार आहेत. ०१  मे २०२४ 

रोजी सकाळी दहा वाजता साहेबराव मुरकुटे महाराज यांच्या  काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होईल त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहेत.

COMMENTS