Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारधी समाज बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

यवतमाळ प्रतिनिधी - कळंब तालुक्यातील नरसापूर येथील वनजमिनीवर आदिवासी पारधी समाजाने केलेले अतिक्रमण वनविभाग आणि पोलिस यांनी बळजबरीने जेसीबीच्या

अरूण गवळीची तुरुंगातून होणार कायमची सुटका ?
राहुरी शहरात नवरात्रोत्सव उत्साहात
Nanded : नांदेड मध्ये आयकर विभागाचे धाडसत्र सुरू

यवतमाळ प्रतिनिधी – कळंब तालुक्यातील नरसापूर येथील वनजमिनीवर आदिवासी पारधी समाजाने केलेले अतिक्रमण वनविभाग आणि पोलिस यांनी बळजबरीने जेसीबीच्या साह्याने हटविले. 25 वर्षांपासून कसत असलेली जमीन देण्यात यावी, या मागणीसाठी पारधी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. नरसापूर शिवारात पोलिस ताफ्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. शेतजमीन वनविभागाची असल्याचे सांगत जेसीबीने खड्डे खोदण्यात आले. अनेक वर्षापासून पारधी समाज शेती करत आहेत. शासन निर्णयानुसार या जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

COMMENTS