Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतजलीने 67 वर्तमानपत्रांमध्ये मागितली जाहीर माफी

नवी दिल्ली : पंतजलीने आपल्या उत्पादनाची केलेली जाहिरात त्यांच्या अंगलट आली असून, या जाहिरातीमध्ये त्यांनी केलेल्या दाव्याविरोधात इंडियन मेडीकल अस

पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.
माध्यम नायक बबनराव कांबळे !
‘वंचित‘चा स्वबळाचा नारा !

नवी दिल्ली : पंतजलीने आपल्या उत्पादनाची केलेली जाहिरात त्यांच्या अंगलट आली असून, या जाहिरातीमध्ये त्यांनी केलेल्या दाव्याविरोधात इंडियन मेडीकल असोसिएशनकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर पंतजलीने सर्वोच्च न्यायालयात माफीनामा मागीतला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने माध्यमांच्याद्वारे जनतेची जाहीर माफी मागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पंतजलने 67 वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहीर माफी मागितल्याची माहिती मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.
सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. यावेळी पंतजलीने सांगितले की, त्यांनी 67 वर्तमानपत्रांमध्ये जाहीर माफी मागितली आहे. येत्या काळात आणखी मोठ्या आकाराची जाहिरात प्रसिद्ध होईल, असे पतंजलीकडून न्यायालयामध्ये सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीची व्याप्ती वाढवली आहे. हे प्रकरण फक्त एका संस्थेपुरते म्हणजे पतंजलीपुरते मर्यादित राहणार नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. दिशाभूल करणार्‍या जाहिरातींद्वारे उत्पादनांची विक्री करून लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या इतर कंपन्यांवर काय कारवाई केली? असा न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल केला आहे. अ‍ॅलोपॅथी डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये विशिष्ट ब्रँडची महागडी औषधे का लिहून देतात? असा सवाल न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनला केला आहे. जाणूनबुजून महागडी औषधे लिहून देणार्‍या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे का? अशी विचारणा देखील यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला केली आहे. कोर्टाने या प्रकरणात प्रत्येक राज्याच्या औषध परवाना प्राधिकरणाला पक्षकार बनवले आहे. पतंजली (बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण) प्रकरणाची 30 एप्रिलला सुनावणी होणार आहे. नव्याने व्याप्ती वाढवलेल्या प्रकरणाची 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीमध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर केला होता. मात्र, न्यायालयाने त्यावर कडक ताशेरे ओढत तो माफीनामा स्वीकारला नव्हता. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने कडक ताशेरे ओढले होते. ही माफी केवळ समाधानासाठी असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. तुमच्यात क्षमेची भावना नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीविरोधात ही याचिका दाखल केली आहे.

COMMENTS