Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या उत्तर विभाग उपाध्यक्षपदी पानसरे यांची नियुक्ती

सोनई/प्रतिनिधी ः अहमदनग जिल्ह्यातील मजले चिंचोली या गावचे सुपुत्र पैलवान पानसरे सी.बी यांची भारतीय जनता पार्टी तर्फे कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्

यंदा चांगल्या पाऊसासोबत अन्नधान्यही मुबलक पिकणार
अहमदनगर महानगरपालिकेच्या मु्ख्य लेखा अधिकाऱ्यास झाला दंड
आईचा गर्भ आणि कबर दोनच ठिकाण सुरक्षित | DAINIK LOKMNTHAN

सोनई/प्रतिनिधी ः अहमदनग जिल्ह्यातील मजले चिंचोली या गावचे सुपुत्र पैलवान पानसरे सी.बी यांची भारतीय जनता पार्टी तर्फे कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रदेश विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यासाठी प्रदेशाध्यक्ष गणेश लक्ष्मणराव ताठे तसेच मंगलताई भंडारी(मुक्ताबाई) नाशिक, श्रीमत बागल महाराज लातूरकर,अहमदनगर जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ मुंडे यांनी भाजप कार्यालय मुंबई या ठिकाणी पत्र देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

        यापूर्वी पै.पानसरे सी.बी यांनी शेतकरी व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नपूर्वक लढे दिलेले आहेत. त्याचमुळे त्यांना महाराष्ट्र राज्य खाजगी माध्यमिक शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच क्रीडा व कला क्षेत्रातील ते अनेक संघटनेवर काम करत आहेत धुळे, नंदुरबार ,जळगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यात त्यांनी आपले कार्यक्षेत्र प्रकट केलेले आहे .ते शिक्षण क्षेत्रातील विद्याविभूषित असून ते क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्काराचे मानकरी आहेत. मुळापाट पाणी कुतीसमीती-डोंगराच्या कडेकडेने होणार्‍या मुळापाट पाणी चारीसाठी त्यांनी कॉम्रेड नामदेवराव आव्हाड ,भाऊराव शिरसाट, सुरेश गवळी यांच्यासोबत लढे दिले .त्यामुळे वांबोरी चारी मुळे अनेकांचे पिण्याचे पाण्याचे प्रश्‍न मिटले. असे हे धेयवेडे कर्तुत्व सिद्ध करणारे म्हणूनच त्यांच्या या कार्याबद्दल सगळीकडे कौतुक होत आहे. या कार्याबद्दल युसुफ शेख, प्रशांत मस्के, अशोक आव्हाड, भागवत कैदके, शशिकांत कर्डिले, भाऊसाहेब कोल्हे , पै.मच्छू कोरडे,पै अशोक मोटे,कीरन आव्हाड, धनंजय वैद्य यांनी अभिनंदन केले. व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

COMMENTS