Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भगवान बाबाच्या नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे राहणार उपस्थित

खरवंडी कासार प्रतिनिधी ःभगवान बाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. या वर्षी श्री क्षेत्र भगवानगडचा फिरता नारळी

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची संशोधनासाठी निवड
पाटणकर विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश
गृहभेटीच्या माध्यमातून मतदानाचे प्रमाण वाढवूया

खरवंडी कासार प्रतिनिधी ःभगवान बाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. या वर्षी श्री क्षेत्र भगवानगडचा फिरता नारळी 89 वा सप्ताह भारजवाडी येथे होणार आहे. सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस व माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे उपस्थित राहणार आहेत. भारजवाडी ग्रामस्थांनी आंबेजोगाई येथे जाऊन पंकजा मुंडे यांना निमंत्रण दिले आहे, यावेळी पंकजा मुंडे यांनी भगवान बाबा यांच्या सप्ताहाचे निमंत्रण स्वीकारले आहे. भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडी गावामध्ये पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करणार आहे. असे भारजवाडी ग्रामस्थ यांनी सांगितले आहे यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय किर्तने भारजवाडी मा. सरपंच बाळासाहेब बटुळे भारजवाडीचे सरपंच माणिक बटुळे वि .वि सोसायटीचे चेअरमन वामन कीर्तने अशोक बांगर सोमनाथ बटुळे अंबादास कराड भास्कर कराड अंबादास कराड  असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS