Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंकजा मुंडेंना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी

बीड प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात काही विद्यमान खासदारांचा पत्त

विश्रांतीनंतर पंकजा मुंडे पुन्हा मैदानात
मी भाजपची, मात्र भाजप माझा नव्हे
…तोपर्यंत फेटा बांधणार नाही ः पंकजा मुंडे

बीड प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला असून, ज्यात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा देखील समावेश आहे. प्रीतम मुंडे यांना डावलून त्यांच्या ज्येष्ठ भगिनी तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडेंचं काय? अशी देखील चर्चा सुरु झाली आहे. तर, प्रीतम मुंडे यांना विधानसभेत संधी दिली जाणार का? याबाबत देखील चर्चा आहे. प्रीतम मुंडे यांना डावलून बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. विशेष म्हणजे भाजपकडून झैर करण्यात आलेल्या उमेदवारीत देखील प्रत्यक्षात प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे सलग 10 वर्ष बीडच्या खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांच्याबाबत आता भाजप कोणता निर्णय घेणार हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे. मुंडे कुटुंबाची बीडच्या राजकारणात मोठी पकड आहे. पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे प्रीतम मुंडे देखील मागील 10 वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा विचार पक्षाकडून केला जाणार का? अशी चर्चा मुंडे समर्थकांमध्ये आहे. 

COMMENTS