पञकार रोहिदास दातिर खुनाच्या गुन्ह्यातील कान्हू मोरे यास राहुरीत अटक

Homeताज्या बातम्या

पञकार रोहिदास दातिर खुनाच्या गुन्ह्यातील कान्हू मोरे यास राहुरीत अटक

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  : राहुरी तालुक्यात पत्रकार रोहिदास दातीर यांचा अपहरण करुन हत्या प्रकरणात अटक असलेला व कोरोना मुञपिंडावर जिल्हा रुग्णालयात

ईशान्येतील राज्यसभेच्या चारही जागांवर भाजपचा कब्जा
थंडीचा कहर, कानपुरात 25 जणांचा मृत्यू
शिवसैनिक हे सेनेचे अंतिम अस्त्र !

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  : राहुरी तालुक्यात पत्रकार रोहिदास दातीर यांचा अपहरण करुन हत्या प्रकरणात अटक असलेला व कोरोना मुञपिंडावर जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना पोलिसाच्या हातावर तुरी देवून फरार झालेल्या कान्हु मोरे यास गुहा ता.राहुरी येथिल मळगंगा मंदिरात लपलेला असताना पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
 राहुरी येथिल पञकार रोहिदास दातिर याच्या खुनाच्या गुन्ह्यात कान्हू मोरे व  त्याच्या  साथिदारांविरोधात भादवि कलम ३०२, ३६३, ३४१, १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. न्यायालय कोठडीत असताना त्यास  कोरोनाची लागन झाल्याने व मुञपिंडावर  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी  दाखल  करण्यात आला होते. परंतु त्याला  मुतखडयाचा त्रास होऊ लागल्याने २८ ऑगस्ट रोजी डॉक्टरानी त्यास पुणे येथे ससून हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेण्यासाठी  रुग्णवाहीनीका बोलवून त्यास त्यामध्ये बसण्यासाठी सांगितले असता त्याला लघुशंका आल्याने तो लघुशंकेच्या बहाण्याने तेथून पोलीसांचे कायदेशीर रखवालीतून पळून गेला होता.या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.             गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना स्वतंत्र पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्या आदेशाप्रमाणे अनिल कटके यांनी साहय्यक पोलिस निरीक्षक  सोमनाथ दिवटे, पोलिस उप निरीक्षक  सोपान गोरे, पो.हे.कों.भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप पवार, पो.ना.शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, ज्ञारेश्वर शिंदे, पो.काँ.कमलेश पाथरुट, आकाश काळे, प्रशांत राठोड, गौतम लगड यांचे स्वतंत्र पथक तयार करुन सदर आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले.आरोपीचा स्वतंत्र पथकामार्फत शोध घेत असतांना पोलिस उप निरीक्षक  सोपान गोरे यांना गुप्त बातमी मिळाली की, सदर गुह्यातील फरार आरोपी  हा मध्यप्रदेश येथे बडवा जिल्ह्यात आहे.  त्यांनतर पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीने सदरचे पथक मध्यप्रदेश येथील बडवा जिल्हयात जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी कान्हु मोरे याचा शोधा घेत असतांना त्यास पोलीस आपला शोध घेत असल्याची चाहूल लागल्याने तो तेथून पसार झाला. त्यानंतर त्याला मदत व आसारा देत असलेले त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरु मरकड (रा. निवडुगे ता. पाथर्डी)आणि सतिश श्रीकांत हरिचंद्र (रा. धामोरी खुर्द ता. राहूरी) यांना तोफखाना पोस्टे येथील नमुद गुन्हयामध्ये भादवी कलम २१२ वाढीव कलम लावून त्यांस अटक केले आहे.                आरोपी  मोरे याचा स्थानिक गुन्हे शाखेतील पथक शोध घेत असतांना अनिल कटके यांना गुप्त बातमी मिळाली की, आरोपी  मोरे हा राहूरी तालुक्यातील गुहा फाट्याजवळील मळगंगा मंदिर परिसरामध्ये वेशांतर करुन व आपले अस्तित्व लपवून वेळोवेळी ठिकाण बदलून वास्तव्य करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुहा फाटा ता. राहूरी येथे जावून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून व आरोपीचा शोध घेवून कान्हु गंगाराम मोरे  यांस मळगंगा मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.        त्याला तोफखाना पो.स्टे. येथे हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही तोफखाना करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक  दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, संदीप मिटके,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके आदींनी  केलेली आहे.

COMMENTS