Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे

शहरटाकळीतील शेतकऱ्याची मागणी

शहरटाकळी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी सह परीसरातील दहीगावने भाविनिमगाव, मठाचीवाडी, रांजणी, घेवरी, ढोरसडे, अंत्रे सह परिसरातील गावात अतिवृष्टीने

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे

शहरटाकळी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी सह परीसरातील दहीगावने भाविनिमगाव, मठाचीवाडी, रांजणी, घेवरी, ढोरसडे, अंत्रे सह परिसरातील गावात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पीक पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्रात अनेक भागात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली आहे  शहरटाकळी  सह  परिसरातील अनेक गावात अनेक दिवसांपासून होत  असलेल्या संततधार पावसामुळे कपाशी. , तूर ,मूग ,सोयाबीन, मका आदी खरीप पिके पूर्णपणे भुईसपाट होत चालली  असून  अति पावसामुळे कपाशी पिके पाण्यात तरंगत आहेत तीच अवस्था व इतर पिकांची आहे परिणामी खरीप हंगामात घेतल्या जाणार्‍या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे  पंचनामे करावीत अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे, कपाशी पिके आतापर्यंत पूर्ण जोमात आले होते, अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून पिक पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहे                                                            
 फोटो ओळी :  शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी सह परिसरात अतिवृष्टीने   कपाशी  पिके कशी पाण्यात तरंगताना दिसत आहेत.            

COMMENTS