Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यटकांनी फुलले पाचगणी, महाबळेश्‍वर

नाताळ, नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची गर्दी

पुणे : नाताळच्या सणानिमित्त लागलेल्या सुट्या आणि त्यातच काही दिवसांनी येऊन ठेपलेले नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांनी आपला मोर्चा पाचगणी, वाई, मह

भारतीय क्रिकेटची ब्राह्मणी परिक्रमा!
क्रूरतेचा कळस…! सख्ख्या बहिणीने महिलेची कापली जीभ | LokNews24
आधी चहात फिनेल, मग गुलाबजाम मध्ये उंदीर मारायचं औषध ! पतीला मारण्याचा प्रयत्न | LOK News 24

पुणे : नाताळच्या सणानिमित्त लागलेल्या सुट्या आणि त्यातच काही दिवसांनी येऊन ठेपलेले नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांनी आपला मोर्चा पाचगणी, वाई, महाबळेश्‍वरकडे वळवल्याचे दिसून येत आहे. पर्यटनस्थळांवरच्या राहण्याच्या सर्व जागा, हॉटेल्स ‘हाऊसफुल’ झालेल्या आहेत. महाबळेश्‍वरच्या प्रसिद्ध वेण्णा तलावापासून ते विविध पॉईंटसपर्यंत सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
आजपासून सुरू झालेली ही गर्दी पुढील आढवठाभर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाताळ सण, नववर्ष साजरे करण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक महाराष्ट्राचे काश्मीर पाचगणी, महाबळेश्‍वरला पसंती देतात. यंदाही पर्यटकांनी मोठ्या संख्येने या पर्यनस्थळी आपला मोर्चा वळवला आहे. अनेक पर्यटकांनी महिनाभर अगोदरच ‘ऑनलाइन’ पद्धतीने लॉज, हॉटेल, रिसॉर्ट, बंगले आणि शेतघरांची नोंदणी केली आहे. ‘एमटीडीसी’ रिसॉर्टचे बुकिंग फुल झाले आहे. याशिवाय शेकडो पर्यटक ऐनवेळेसही पाचगणी, महाबळेश्‍वरकडे वळले आहेत. गेल्या काही वर्षांपासून अनेक पर्यटक आता पाचगणी, महाबळेश्‍वरच्या परिसरातील छोट्या मोठ्या गावांमध्येही राहतात. या पर्यटन सप्ताहानिमित्त बहुेतक सर्व हॉटेल, लॉजवर विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली आहे. अनेकांनी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. सोबतच काहींनी विशिष्ट प्रकारचे ‘फूड फेस्टीवल’चे आयोजनही केलेले आहे. दरम्यान येथे आलेल्या पर्यटकांनी महाबळेश्‍वरमधील वेण्णालेक केटस पॉइंट, बॉम्बे पॉईंट, लॉडविक पॉईंट, विल्सन पॉईंट, पाचगणीमधील पारसी पॉईंट, सिडनी पॉईंट, टेबल लँड आदी पॉईंटस, प्रसिद्ध वेण्णा तलाव, पाचगणीचे विविध पॉईंटस, पठार, पुस्तकांचे गाव भिलार तसेच श्री क्षेत्र महाबळेश्‍वर फुलून गेले आहे. विविध पॉईंट्सवरून पर्यटक निसर्गाचे रूप न्याहाळत आहेत. तर वेण्णा तलावात जलक्रिडेचा आनंद घेत आहेत. सध्या येथे नौकानयनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अशाच पद्धतीने अश्‍वारोहणासाठीही पर्यटक गर्दी करत आहेत. पाचगणी, महाबळेश्‍वरला जोडूनच अनेक पर्यटक वाई, भिलार, तापोळा, प्रतापगड, कास पठारकडे जात आहेत. दरम्यान, येथे आलेल्या पर्यटकांनी पाचगणी, महाबळेश्‍वरच्या बाजारपेठाही भरून गेल्या आहेत. येथील फुटाणे, काठी, चप्पल, ऊबदार कपडे, टोप्या, विविध सरबते, ग्रामीण वस्तू, मध, जंगली पदार्थ, रानमेवा, खेळणी यांनी महाबळेश्‍वरची बागजारपेठ सजली आहे. महाबळेश्‍वर पाचगणी येथील खाद्यपदार्थही पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. स्ट्रॉबेरी, मसालेदार मक्याचे कणीस, थंडीतही खाल्ल्या जाणारा आईस गोळा, पाचगणीचे प्रसिद्ध आईस्क्रीम, चणे फुटाणे चिक्की असे विविध खाद्य प्रकार पर्यटकांचे स्वागत करत आहेत. दरम्यान, या निमित्ताने परिसरातील विविध तीर्थक्षेत्रांवरही पर्यटक गर्दी करत आहेत. श्री क्षेत्र महाबळेश्‍वर, वाई-मेणवली येथील ऐतिहासिक मंदिरे, घाटांवरही पर्यटक येत आहेत. महाबळेश्‍वर आणि वाईत ब्रिटिशकालीन जुनी चर्चदेखील आहेत. या चर्चमध्येही नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोट्या संख्येने आलेल्या या पर्यटकांमुळे महाबळेश्‍वरकडे येणार्‍या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहण्यास मिळत आहेत. सध्या नगरपालिकेसह, पोलिस यंत्रणेला या वाहतुकीचे नियंत्रण आणि सुरळीत ठेवण्याचे मोठे काम करावे लागत आहे

COMMENTS