Homeताज्या बातम्यादेश

अमृतसरच्या सीमेवर आढळले पाकिस्तानी ड्रोन

अमृतसर ः भारत-पाकिस्तान सीमेवर काही दिवसांपासून थांबलेली ड्रोनची हालचाल पुन्हा वाढू लागली आहे. पंजाब सीमेवर सलग दुसर्‍या दिवशी ड्रोन जप्त करण्यात

अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात!
उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे
 ओबीसी महिला सरपंच व सरपंच प्रतिनिधी यांना ग्रामपंचायत सदस्या कडून मारहाण 

अमृतसर ः भारत-पाकिस्तान सीमेवर काही दिवसांपासून थांबलेली ड्रोनची हालचाल पुन्हा वाढू लागली आहे. पंजाब सीमेवर सलग दुसर्‍या दिवशी ड्रोन जप्त करण्यात आले आहेत. राज्यपाल बनवारी लाला पुरोहित यांच्या आदेशानुसार भारत-पाक सीमेवरील गावांमध्ये तयार करण्यात येत असलेल्या सुरक्षा समित्यांच्या माहितीच्या आधारे रविवारी हे ड्रोन जप्त करण्यात आले.
बीएसएफच्या म्हणण्यानुसार, अमृतसरच्या सीमावर्ती गावात असलेल्या कक्कर गावातून हे ड्रोन जप्त करण्यात आले आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही ड्रोन जप्ती केली आहे. हा ड्रोन वेगळ्याच प्रकारचा आहे. हे आता तपासासाठी पाठवले जाईल. त्यांनतर याविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे. दुसरीकडे, आदल्या दिवशी तरनतारनच्या राजोके या सीमावर्ती गावातून एक ड्रोन जप्त करण्यात आला होता. हे डीजेआय मॅट्रीस 300 आरटीके ड्रोन होते, ज्याचा वापर पाकिस्तानी तस्कर भारतीय सीमा ओलांडून हेरॉइन पाठवण्यासाठी करतात. गेल्या महिन्याभरात पंजाबच्या सीमेवर एकूण 8 ड्रोन जप्त करण्यात आले होते. रविवारी जप्त केलेले ड्रोन हे या महिन्यातील दुसरे ड्रोन आहे.

COMMENTS