पाकिस्तानी कलाकाराने भारतीय प्रेक्षकांना दिल एक खास गिफ्ट.

Homeताज्या बातम्यादेश

पाकिस्तानी कलाकाराने भारतीय प्रेक्षकांना दिल एक खास गिफ्ट.

कलाकार सियाल खानने भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ची वाजवली धून

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कसे आहेत, हे जगजाहीर आहे. मात्र, आता पाकिस्तानमधून एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो भारतीयांचं मन जिंकतोय. सोमवारी म्हणजे

‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी
सांगली जिल्ह्यातील उमदी येथे आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
श्रीगोंद्यात शिवसेनेच्या युवासेनेत पक्षप्रवेश व कार्यकारिणी जाहीर

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कसे आहेत, हे जगजाहीर आहे. मात्र, आता पाकिस्तानमधून एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो भारतीयांचं मन जिंकतोय. सोमवारी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी भारतात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा झाला. याच खास दिवशी पाकिस्तानमधील एका रबाब वादक कलाकाराने आपल्या भारतीय प्रेक्षकांना एक खास गिफ्ट दिलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाकिस्तानी कलाकार सियाल खान(Sial Khan) रबाब वाद्याच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ची धून वाजवताना दिसतात. रबाब हे वीणासारखे एक तंतुवाद्य आहे . हे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि काश्मीरमध्ये खूप लोकप्रिय आहे. सियाल यांनी खास अंदाजात भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, भारतीयांसह पाकिस्तानी नागरिकांनीही सियाल यांचं कौतुक केलं आहे.

COMMENTS