Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पाकचा काबूलवर हवाई हल्ला; 400 जणांचा मृत्यू

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे सोमवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर मृतांचा आकडा 400 वर पोहोचल्याची माहिती स्थानिक प्रशा

सोशल मीडियावर बदनामी पडणार महागात; राज्य सरकारकडून पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन
श्रीगोंद्यात भर रस्त्यात गॅस सिलेंडर वितरण; नागरिकांची कोंडी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तेहरान हल्ल्यानंतर मोजतबा खामेनेई कोमामध्ये

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे सोमवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर मृतांचा आकडा 400 वर पोहोचल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच तीव्र झाला असून सीमावादाचे पडसाद आता उघड संघर्षात उमटताना दिसत आहेत.
अफगाणिस्तानच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, व्यसनमुक्ती उपचारासाठी असलेल्या एका रुग्णालयावर हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात रुग्णालयाच्या इमारतीचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून अनेक रुग्ण आणि कर्मचारी ढिगार्‍याखाली अडकले. बचाव पथके घटनास्थळी तातडीने दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासह अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुमारे 250 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या प्रशासनाने या कारवाईला देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन ठरवत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. निरपराध रुग्णांवर हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करत याला अमानुष कृत्य म्हटले असून योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे पाकिस्तानने मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. त्यांच्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले की, काबूलसह पूर्व अफगाणिस्तानातील कारवाया केवळ दहशतवादी तळांवर केंद्रित होत्या आणि कोणत्याही नागरी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही. ही मोहीम अत्यंत अचूक आणि मर्यादित स्वरूपाची होती, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या हवाई कारवाईपूर्वी दोन्ही देशांच्या सीमेलगत तीव्र गोळीबार झाल्याची माहिती आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेला तणाव आता अधिक गंभीर वळणावर पोहोचल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. परिस्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात असून पुढील काही दिवस या संघर्षाच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानातील सत्ताधारी गटाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी काबूलमधील व्यसनमुक्ती केंद्रावर हा हल्ला झाला. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णालयातील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचेही सांगितले जात आहे.


अमानवीय आणि निदंनीय : भारताकडून हल्ल्याचा निषेध
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे रुग्णालयावर झालेल्या कथित हवाई हल्ल्यानंतर भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा हल्ला अमानवीय व निंदनीय असल्याचे स्पष्ट करत आंतरराष्ट्रीय स्तरावर दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला रुग्णालयासारख्या संवेदनशील आणि संरक्षित स्थळावर झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही संताप व्यक्त होत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत समर्थन देता येणार नाही. या घटनेतील दोषींना आंतरराष्ट्रीय समुदायाने जबाबदार धरावे, अशी मागणी भारताने केली आहे. तसेच, अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणे अत्यावश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भारताने या दुःखद घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

COMMENTS