पी.यु.सी. प्रमाणपत्रांचे सुधारीत दर जाहिर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पी.यु.सी. प्रमाणपत्रांचे सुधारीत दर जाहिर

 अहमदनगर  :- महाराष्ट्र शासनाच्या २५ एप्रिल, २०२२ च्या निर्देशानुसार राज्यातील पी.यु.सी. चाचणीच्या दरामध्ये सुधारणा करून दर वाढीस मंजुरी देण्यात आली

शेततळ्यात पडून सासरा-सुनेचा दुर्दैवी मृत्यू
आमदार योगेश टिळेकर यांचे कर्जत-जामखेडमध्ये स्वागत
कोपरगावमध्ये महसूल विभागाच्या विरोधात शेतकरी आक्रमक

 अहमदनगर  :- महाराष्ट्र शासनाच्या २५ एप्रिल, २०२२ च्या निर्देशानुसार राज्यातील पी.यु.सी. चाचणीच्या दरामध्ये सुधारणा करून दर वाढीस मंजुरी देण्यात आली आहे. परिवहन आयुक्तमहाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार वायुप्रदुषण नियंत्रण केंद्रांना आवाहन करण्यात येते कीमोटार वाहनांची वायुप्रदुषण तपासणी करून वायुप्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सुधारीत दराची आकारणी करण्यात यावी. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी 50 रुपयेपेट्रोलवरील तीनचाकी वाहनांसाठी 100 रुपयेपेट्रोल / सीएनजी/ एलपीजीवर चालणारे चार चाकी वाहनांसाठी १२५ रुपयेडिझेलवर चालणारे वाहनांसाठी १५० रुपये सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. हे दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायु प्रदुषण तपासणीसाठी देय राहतील. पी.यु.सी. केंद्रांच्या मालकांनी पी.यु.सी. केंद्रावार सुधारीत दराचे फलक दर्शनीय ठिकाणी प्रदर्शित करावे असे अहमदनगरच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

COMMENTS