Homeताज्या बातम्यादेश

Oyo संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलाचे निधन

नवी दिल्ली : ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा गुरुग्राममधील इमारतीच्या 20व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. आज

Dakhal : बाळ बोठेच्या कोठडीत सापडला मोबाईल ! पोलीस करताय काय ? | LokNews24
सायरस मिस्त्रीची उचलबांगडी वैध
इस्लामपूरातील प्रभाग 11 मध्ये काट्याच्या लढती…?

नवी दिल्ली : ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा गुरुग्राममधील इमारतीच्या 20व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश अग्रवाल यांचा इमारतीच्या 20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. गुरुग्राममधल्या डीएलएफ ‘द क्रेस्ट’ सोसायटीत अग्रवाल कुटुंब राहात होते. याच इमारतीत रितेश अग्रवाल याचेही घर आहे. रमेश अग्रवाल हे दुपारी एकच्या सुमारास घराच्या बालकीन होते. यावेळी बालकीतून पडून त्यांचा मृत्यू झाला. मात्र. रमेश अग्रवाल बाल्कनीतून खाली कसे पडले याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना घडली त्यावेळी मुलगा रितेश अग्रवाल, सून आणि रमेश अग्रवाल यांची पत्नी घरातच होते, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.

COMMENTS