Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामान्यांचा विकास हीच आमची एकमेव भूमिका

रेणापूर प्रतिनिधी - अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रेणापूर येथील श्री रेणुकादेवी मातेचे दर्शन घेवून रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीती

बिलोली पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न
उस्माननगर येथे डॉ.बाबासाहेब  आंबेडकर जयंतीचे आयोजन
सशक्त नौदलाची संकल्पना शिवरायांची

रेणापूर प्रतिनिधी – अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रेणापूर येथील श्री रेणुकादेवी मातेचे दर्शन घेवून रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील काँग्रेस प्रणित कृषी विकास पॅनेलच्या प्रचाराचा ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्यांचा विकास हीच आमची एकमेव भूमिका आणि एकमेव ध्येय आहे, असे सांगून कृषी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देत विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील काँग्रेस प्रणित कृषी विकास पॅनेलच्या प्रचाराचा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शनिवारी शुभारंभ झाला. त्यानंतर आमदार धिरज देशमुख यांनी व्यापक बैठक घेवून मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, विजय देशमुख, प्रमोद जाधव, लालासाहेब चव्हाण, दिलीपराव पाटील, रमेश सूर्यवंशी, चंद्रचूड चव्हाण, अनंतराव देशमुख, विश्वासराव देशमुख, माणिकराव सोमवंशी, कृषी विकास पॅनलचे उमेदवार मुरलीधर पडुळे, सुशीलकुमार पाटील, प्रकाश सूर्यवंशी, प्रमोद कापसे, अमर वाकडे, नागनाथ कराड, अशोक राठोड, उमाकांत खलंग्रे, शेषराव हाके, जयश्री जाधव, राजामती साळुंके, शिरीष यादव, प्रवीण माने, विश्वनाथ कागले, शिवाजीराव आचार्य, जनार्दन माने, कमलाकर आकनगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार धिरज देशमुख म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सामान्य लोकांच्या हिताला केंद्रबिदू मानून आयुष्यभर काम केले. मुंडे साहेबांच्या मतदारसंघाचा काही भाग लातूरला जोडला गेला तेव्हा लोकनेते विलासराव देशमुख यांनी मुंडे यांना ‘आता ही तुमची माणसं माझी माणसं झाली आहेत. तुम्ही निश्चित रहा,’ असा शब्द दिला होता. तो शब्द पाळण्याचे काम लोकनेते विलासराव देशमुख यांनी केले. यानिमित्ताने एकमेकांशी जोडले गेलेले बंध पुढे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जपले. वृद्धिंगत केले. जे जे नवे लातूरला, ते ते रेणापूरला हवे, यानुसार सहकार महर्षि दिलीपराव देशमुख यांनी साखर कारखाना, बाजार समिती, जिल्हा बँकेच्या माध्यमातून लातूर शहर व तालुक्याच्या विकासाबरोबर रेणापूर तालुक्याला उभे करण्याचे काम केले. शेतक-यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रेणा साखर कारखाना उभारला. येणा-या काळातही रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लौकिक आणखी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या दिशेने एकेक पाऊल टाकत आहोत, असा निर्धार आमदार धिरज देशमुख यांनी सांगितला. रेणापूर बाजार समितीचे विस्तारीकरण, गोडाऊन बांधणी, शेतीमाल तारण योजना आदीच्या माध्यमातून मागील संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. येणा-या काळात आपली बाजारपेठ अधिक मजबूत करण्याबरोबरच नवीन पिकांना बाजार उपलब्ध करणे, रेशीम शेतीला प्रोत्साहन देवून त्यांचे मार्केट उभे करणे, पानगाव येथे नवीन बाजारपेठ विकसित करणे, रेणापूर शहरात जनावरे व भाजीपाला याकरिता बाजारपेठेचा विस्तार करणे अशी विविध कामे आम्हाला करायची आहेत. या माध्यमातून शेतक-यांना लाभ होईल, त्यांना आपल्या शेतीमालासाठी सर्व सोयींयुक्त हक्काची बाजारपेठ मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले. कृषी विकास पॅनलमधील हमाल व मापाडी मतदारसंघातील बिनविरोध निवडून आलेले बाळकृष्ण खटाळ यांचे आमदार धिरज देशमुख यांनी अभिनंदन केले. राजेसाहेब खाडप, नारायणराव अंबेकर, तानाजी कणसे, उमेश सोमाणी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत, सहकारी संस्था, व्यापारी मतदारसंघातील मतदार, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS