Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्यथा सहकार मंत्र्याची शिमगा दिवाळी साजरी करू : आ. सदाभाऊ खोत

कराड / प्रतिनिधी : पैसै कुणाला नको आहेत हे सहकार मंत्र्यांनी जाहीर करावे. उसाला एक रकमी एफआरपी देण्यास विरोध करणार्‍या सहकार मंत्र्यांनी त्यांचा

वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे हेळसांड झाल्याने जखमी मोराचा मृत्यू
जमिन खरेदीप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरेविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा लगतच्या भेंडवडे इनमदारवाडी येथे वृक्षतोड

कराड / प्रतिनिधी : पैसै कुणाला नको आहेत हे सहकार मंत्र्यांनी जाहीर करावे. उसाला एक रकमी एफआरपी देण्यास विरोध करणार्‍या सहकार मंत्र्यांनी त्यांचा आणि त्यांचा पीएचा ही पगार तीन टप्प्यात घ्यावा. जर एकरकमी एफआरपी देण्यास टाळाटाळ करून जर शेतकर्‍यांची काळी दिवाळी करणार असतील तर आम्ही सहकार मंत्र्यांच्या दारात जाऊन शिमगा दिवाळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते आ. सदाभाऊ खोत यांनी दिला.
कराड येथे रयत क्रांती संघटनेने आज दि. 1 नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कृष्णत क्षीरसागर यांच्यासह शेतकरी आपले ट्रक्टर घेवून मोर्चात सहभागी झाले होते. कृष्णा कॅनाल ते कराड तहसील कार्यालयापर्यंत ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात एकरकमी एफआरपीची मागणी करण्यात आली.
सहकार मंत्री हा स्वयंभू मंत्री नाही. कारण त्याच दाव एकाच्या हातात, त्याला पाणी एकजण पाजत असतो, वैरण एकजण टाकत असतो आणि त्याला पाटीवर गिरवून दिल्यावर वाचून दाखवण्याच काम तो सहकार मंत्री करत असतो, असे टोलेही सहकार मंत्र्यांना आ. सदाभाऊ खोत यांनी लगावला.

COMMENTS