अन्यथा मरण अटळ

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अन्यथा मरण अटळ

सावंतवाडी वनपरिक्षेत्रात काल एक बिबट्या एका घरात घुसल्याची बाब समोर आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला पिंजऱ्यात बंद करून  सुरक्षित

संजीवनीचा महर्षी
कॅगच्या अहवालातून होणार ठाकरे गटाची कोंडी ?
आदिवासी कन्येचा विजय

सावंतवाडी वनपरिक्षेत्रात काल एक बिबट्या एका घरात घुसल्याची बाब समोर आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला पिंजऱ्यात बंद करून  सुरक्षित स्थळी सोडले आहे. मागील काही वर्षांपासून बिबट्या मानवी वस्तीमध्ये येऊन दहशत निर्माण करत असल्याची चर्चा सर्वांकडून होते. मात्र हा बिबट्यावर मानवांकडून बिनबुडाचा आरोप केला जात आहे. खरेतर बिबट्या हा मानवी वस्तीत घुसला नसुन माणसे बिबट्याच्या रहदारीत घुसलेले आहेत. मानवाने विकासाच्या नावाखाली जंगले नष्ट करून बिबट्याचे रहदारी क्षेत्र धोक्यात आणले असल्यामुळे बिबट्या आणि माणूस असा संघर्ष सुरु झालेला आहे.
मानवाने निसर्गातील झाडांची बेसुमार कत्तल करून सिमेंटची जंगले निर्माण केली आहेत. यामुळे आपल्या देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील पर्यावरण धोक्यात आलेले आहे. त्यामुळे त्सुनामी, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, दुष्काळ अस्या संकटाचा मानवाला सामना करावा लागत आले. हे सर्व संकटे निसर्ग निर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत हे सर्वानी लक्षात घेणे गरजेचे आहे. मागे काही वर्षाखाली दरड कोसळलेल्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. यात अनेक लोकांचा जीव गेलेला आहे. आता यात दरडीचा काय दोष आहे?. माणसांनी डोंगर पोखरून- पोखरून मानवी वस्ती निर्माण केली. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार आपल्याकडे झालेले आहेत.
निसर्गाचा दिवसोंदिवस ऱ्हास होत आहे. प्लॅस्टिकच्या युगात माणसांनी सर्व जमीन खराब केलेली आहे. अती रासायनिक खताचा वापर माणसाने जमिनीत सुरु केल्यामुळे आपल्याकडे जमिनीचा पोत खराब झालेला आहे. याचे गंभीर परिणाम माणसाबरोबर पृथ्वीवरच्या सर्व जीवांवर होत आहे. हे कधी थांबणार हा सर्वात मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. हि समस्या सर्व जगाची आहे. माणसाने विकासाच्या नावाखाली कारखाने उभे करून सर्व तऱ्हेचे प्रदूषण निर्माण केले आहे. त्यामुळे आता माणसांना शुद्ध हवा मिळणे कठीण होऊन बसले आहे. माणूस सध्या विकतची शुद्ध हवा घेतो हे आपण कोविड काळात पाहिले आणि अनुभवले आहे. माणसे विकतची शुद्ध हवा घेतात पण वन्य प्राणी पशु पक्षी आणि इतर सर्व जीवाचे काय? हा प्रश्न देखील गंभीर आहे. माणसाच्या अस्या स्वार्थी आणि पर्यावरण विरुद्धच्या कृतीमुळे सर्व काही धोक्यात आलेले आहे. जागतिक पातळीवर पर्यावरण वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. पण माणसांनी पृथ्वीची चाळणी केलेली आहे ती कशी भरून काढायची? हा सर्वांसमोर गंभीर प्रश्न आहे.
समुद्रातील पाणी देखील माणसांनी खराब केलेले आहे. यामुळे अनेक जलचर जीव संपूर्णपणे नष्ट झालेले आहे. पृथ्वीवरी दूषित पाण्यामुळे आज निसर्गाचे शुद्ध पाणी पिण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. हे सर्व गंभीर असून माणसांनी पर्यावरण, जल आणि जंगल वाचवण्यासाठी ठोस कृतिकार्यक्रम आखण्याची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भात सर्वच देशांनी विविध कायदे केलेले आहेत मात्र नुसते कायदे करून भागात नाही तर त्यासाठी माणसांनी वर्तनातून हे सर्व चित्र बदलणे गरजेचे झालेले आहे. नसता दरडी कोसळून माणसांनी तयार केलेले कृत्रिम गावे जसे नष्ट झाले आहेत तसेच मानवी जीवन सुद्धा एकदिवस नष्ट होईल. त्यामुळे माणसांनी आतापासून सुधारण्याची गरज आहे. अन्यथा मरण अटळ. 

COMMENTS