उस्मानाबाद : अतिवृष्टीने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून वाकडी-इस्थळ (ता. कळंब) येथील १७ जण मांजरा नदीच्या पाण्यात आडकले असून एनडीआरएफचे (N
उस्मानाबाद :
अतिवृष्टीने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून वाकडी-इस्थळ (ता. कळंब) येथील १७ जण मांजरा नदीच्या पाण्यात आडकले असून एनडीआरएफचे (NDRF) पथक दाखल झाले आहे.
अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून काही ठिकाणी गावे संपर्काहीन झाली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात मोठा पाऊस झाल्याचे नागरिक सांगत आहेत. जिल्ह्यात सोमवारी रात्रभर झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण उडाली आहे. जिल्ह्यातील तेरणा, मांजरा नद्यांनी पात्र सोडले असून शेत आणि शिवारात पाणी पाहायला मिळत आहे. तेरणा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असून उस्मानाबाद लातूर वाहतूक बंद झाली आहे.जिल्ह्यातील तेर, रामवाडी, इर्ला आणि दाऊतपूर गावात तेरणा नदीचे पाणी घुसले असून या गावातील काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. धरणात येणारा पाण्याचा प्रवाह स्थिर आहे. सध्या पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्यामुळे नदीचे पाणी वाढण्याचीशक्यता कमी आहे. मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी. बाहेरगावी जाण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इत्थळ वाकडी येथील काही शेतकरी कुटुंब मांजरा नदीच्या काठावर शेतात राहतात. त्या भागाला पाण्याने व्यापले आहे. पहिल्या मजल्याचा संपूर्ण भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तेथील नागरिक दुसऱ्या मजल्यावर जावून बसले आहेत. एका शेतकऱ्याने तर त्याची गाय आणि वासरू दुसऱ्या मजल्यावर चढविले आहे.
इत्थळ वाकडी येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ची टीम लातूर येथून येत आहे. तहसीलदार, उपविभागीय
अधिकारी अहिल्या गाठाळ घटनास्थळी (वाकडी-इत्थळ) दाखल झाल्या आहेत. मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असून तेथील नागरिकांना बाहेर काढणे जिकीरीचे आहे. त्यासाठीच एनडीआरएफचे पथक मागविले आहे.
COMMENTS