Homeताज्या बातम्यामनोरंजन

’नाटू-नाटू’ वर ऑस्करची मोहोर

सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म’द एलिफंट व्हिस्परर्स’

लॉस एंजेलिस/वृत्तसंस्था ः चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या 95 व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली असून, यात भारतान

पंतप्रधान मोदींचा मेट्रोला हिरवा झेंडा
हिमाचलमध्ये बर्फवृष्टी ; रस्ते बंद झाल्याने प्रवाशांची कोंडी
दानवेंच्या कार्यकर्त्यांचा कुंभार कुटुंबावर हल्ला

लॉस एंजेलिस/वृत्तसंस्था ः चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या 95 व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली असून, यात भारताने दोन पुरस्कार पटकावले आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला आहे. तर ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ या डॉक्युमेंट्रीनेही ऑस्कर पटकावला आहे.
लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या या अवॉर्ड शोमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्सची रेलचेल होती. त्यांच्या उत्कृष्ट आणि फॅशनेबल लूकमध्ये सजलेल्या या स्टार्सनी शॅम्पेन रंगीत कार्पेटवर एन्ट्री केली. संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. ‘नाटू नाटू’चा पुरस्कार स्वीकारताना किरावानी म्हणाले, मी कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे. किरवानी यांचं स्टोजवर स्पीच सुरू असताना दीपिका पदुकोण भावूक झाली होती. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि सामान्य लोक सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना दिसत आहेत. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा सुरू झाला. त्यानंतर भारताला दोन पुरस्कार मिळाल्यामुळे हा ऑस्कर सोहळा खास ठरला. यापूर्वी ’नाटू-नाटू’ या गाण्याला ’गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला होता. भारतीय चित्रपट ’द एलिफंट व्हिस्परर्स’ने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे. कार्तिकी गोन्साल्विसने याचे दिग्दर्शन केले आहे. तर गुनीत मोंगा ने प्रोड्यूस केला होता. पुरस्कार स्वीकारंताना गुनीत म्हणाली की- 2 महिलांनी भारतासाठी हे करून दाखवले. हा पुरस्कार माझ्या देशासाठी समर्पित आहे. ऑस्कर पुरस्कार प्राप्त झालेल्या गुनीत यांचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांच्या ’पिरियड एंड ऑफ सेंटन्स’ या चित्रपटाला 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. ’द एलिफंट व्हिस्पर्स’ या चित्रपटात बोमन आणि बेली या दक्षिण भारतीय जोडप्याची कथा आहे. जे रघु नावाच्या अनाथ हत्तीची काळजी घेतात. मानव आणि प्राण्यांमधील नातं या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट : ’एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर
सर्वोत्तम दिग्दर्शन : ’एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’

COMMENTS