Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशेष स्वच्छता मोहीमेंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

नाशिक - दि.१२ जानेवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील युवक महोत्सवाचे आयोजन हे नाशिक जिल्ह्यात होत असल्याने संपूर्ण देशातून युवक या कार्यक्रमात सहभागी

पोलिस ठाणे आणि न्यायालयाच्याआवारातूनच दुचाकीची चोरी
बांग्लादेशी अभिनेत्रीचा खून, पोत्यात सापडले मृतदेहाचे दोन तुकडे | DAINIK LOKMNTHAN
आदिवासी बांधवांनी विकास योजनांबाबत जागरूक रहावे

नाशिक – दि.१२ जानेवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील युवक महोत्सवाचे आयोजन हे नाशिक जिल्ह्यात होत असल्याने संपूर्ण देशातून युवक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या युवक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने दि. ६ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत आज ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले. शाळांमध्ये स्वच्छता शपथ, पंचायत समिती तसेच ग्रामंपंचायत कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली.

दि.१२ जानेवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील युवक महोत्सवाचे आयोजन हे नाशिक जिल्ह्यात होत असल्याने नाशिक जिल्हयात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत जिल्हा परिषदेच्या सात प्रमुख विभागांचा सहभाग असून दररोज विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. आज जिल्हयात ग्रामपंचायत कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. शाळांमध्ये स्वचछता शपथेचा उपक्रम घेण्यात आला. आरोग्य विभागांतर्गत किशोरवयीन मुलींचे मेळावे घेऊन त्यांना वैयक्तिक स्वच्छता व अन्य आरोगयविषयक माहिती देण्यात आली. अंगणवाडी केंद्राचीही स्वच्छता करण्यात आली. 

विशेष स्वच्छता मोहिमेचे तालुका व जिल्हा स्तरावरुन दैनंदिन सनियंत्रण करण्यात येत असून नियोजनाप्रमाणे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहे.

COMMENTS