राहुरी/प्रतिनिधी ः येणार्या दर्श भावुका अमावस्थेनिमित्त शुक्रवारी 19 मे रोजी राहुरी शहरातील सार्वजनिक सेवाभावी मंडळाच्या वतीने शनीजयंती उत्सव सा
राहुरी/प्रतिनिधी ः येणार्या दर्श भावुका अमावस्थेनिमित्त शुक्रवारी 19 मे रोजी राहुरी शहरातील सार्वजनिक सेवाभावी मंडळाच्या वतीने शनीजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवग्रहांपैकी येथे शनी, राहु, केतू, मारूती, शितळा माता मंदीर, श्रीदत्त मंदीर, श्री अमृतेश्वर मंदीर आदी सर्व एकाच ठिकाणी असल्याने या मंदिराची आख्यायिका मोठी आहे.
या ठिकाणी हरियाण, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, हैद्राबाद, बैंगलोर, म्हैसूर, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक येतात. येथे संकल्प अभिषेक, रूद्र अभिषेक, होमहवन, पुण्य हवन, शांती अभिषेक, अभिषेक दर्शन, पंचामृत अभिषेक, हवणात्मक अभिषेक इत्यादी विधीवत पुजा केली जाते. शुक्रवार 19 मे 2023 सालाबाद प्रमाणे दर्श भावुका अमावस्या श्री शनैश्चर जयंती साजरी होणार आहे. यादिवशी भाविकांना निस्वार्थपणे सेवा दिली जाते. शनि जयंती यादिवशी म्हणजे शुक्रवार 19 मे ते पुढील एक महिन्यापर्यंत शनिवारची आरती करण्यासाठी नाव नोंदणी चालू आहे. आरतीसाठी यजमानांकडून चिठ्ठी काढली जाते. शहरासह तालुक्यातून दर शनिवारी भाविक प्रसाद मंदिरात देतात. प्रसादासाठी भाविक स्वखुशीने साखर, ह.दाळ, तुप, तेल किंवा रोख स्वरूपात देणगी देतात. तरी ज्या भाविकांना आरती दर्शन, पुजा अभिषेक किंवा देणगी द्यावयाची त्यांनी शनैश्वर सार्वजनिक सेवाभावी मंडळ, राहुरी यांचे संपर्क करावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS